कळे जिल्हा परिषद मतदार संघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रेश्मा सूर्यवंशी इच्छुक.
कळे जिल्हा परिषद मतदार संघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रेश्मा सूर्यवंशी इच्छुक.
------------------------
कळे प्रतिनिधी
सुनिल मोळे
------------------------
कळे जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षातून सौ रेश्मा शरद सूर्यवंशी या मुळ ओबीसी असून कळे जिल्हा परिषद उमेदवार म्हणून इच्छुक असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
रेश्मा सूर्यवंशी या पती शरद सूर्यवंशी यांच्या माध्यमातून धामणी खोऱ्यातील जनमानसात एक चांगले नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. शरद सूर्यवंशी हे के.डी.सी.सी बँक निरीक्षक म्हणून धामणीखोऱ्यात शाखा आकुर्डे व वेतवडे येथे गेली २७ वर्षे कार्यरत आहेत.त्यामुळे त्यांची धामणी खोऱ्यातील आणि कळे परिसरातील घराघरात व शेतकऱ्यांशी असणारी ओळख. के.डी.सी.सी बँक निरीक्षक असल्यामुळे गावागावातील विकास सेवा संस्था व दूध संस्था पदाधिकारी व सभासद यांच्याशी नेहमी असणारा जनसंपर्क त्यामुळे धामणी खोऱ्यात आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांच्या नावाची एकच चर्चा आहे.कळे परिसरात बँकेचा प्रदिर्घ अनुभव व उत्तम कुस्तीपटू असल्यामुळे माणसांच्या मनावरती त्यांची असणारी छाप, मोठा जनसंपर्क व मित्र परिवार असणारे शरद सूर्यवंशी म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाचे व आमदार डॉ विनयरावजी कोरे यांचे विश्वासू सहकारी व जनसुराज्य शक्ती पक्षाचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते.रेश्मा सुर्यवंशी यांनीही कळे जिल्हा परिषद मतदार संघात महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.त्यामुळे महिला मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.जनमाणसातील ही भावना त्यांना विजयाकडे नेणारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता कळे जिल्हा परिषद मतदार संघातून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून नेमकी कोणाच्या पारड्यात उमेदवारी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

No comments: