Header Ads

सामाजिक कामातून राजकीय मैदानात प्रवेश शितल कांबळे ना स्थानिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा.

 सामाजिक कामातून राजकीय मैदानात प्रवेश शितल कांबळे ना स्थानिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा.

------------------------------

कळे प्रतिनिधी

सुनील मोळे

------------------------------

कळे/ पन्हाळा तालुक्यातील वेतवडे पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने सौ. शितल बाजीराव कांबळे यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या शितल कांबळे या सामाजिक जाणिवेतून काम करणारे अग्रगण्य कार्यकर्ते बाजीराव कांबळे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. स्वर्गीय माजी मंत्री दिग्विजय खानविलकर व स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कांबळे कुटुंबाची ओळख असून स्थानिक राजकारणात त्यांचा ठसा ठळकपणे जाणवतो.

बाजीराव कांबळे हे खानविलकरांच्या मुशीत तयार झालेले, प्रशासनाचा सखोल अभ्यास असलेले कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटीगाठी घेत असून नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेत आहेत.

निवडणुकीतील विविध आखाड्यांची चांगली जाण असल्यामुळे त्यांच्या प्रचाराला अधिक गतिमानता आली आहे. परिणामी, शितल कांबळे यांच्या उमेदवारीमुळे वेतवडे पंचायत समितीची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

No comments:

Powered by Blogger.