आळते येथे गांजाच्या लागवडीवर पोलिसांचा छापा; 2.52 लाखांचा मुद्देमाल जप्त
आळते येथे गांजाच्या लागवडीवर पोलिसांचा छापा; 2.52 लाखांचा मुद्देमाल जप्त.
पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी सुमारे 16.840 किलो वजनाची, अंदाजे 2 लाख 52 हजार 600 रुपये किमतीची गांज्याची झाडे जप्त करण्यात आली. सदर मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी सुकुमार भूपाल चौगुले (वय 72, रा. ढवळे मळा, आळते) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत पोलीस हवालदार धनाजी भोसले, पोलीस शिपाई अमित कांबळे, राहुल टोणपे, विकास घस्ते, किरण बिंदगे, सूरज सोहनी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.

No comments: