Header Ads

करवीर पोलिसांची कारवाई; गावठी रिव्हॉल्वरसह आरोपी जेरबंद १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त; गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई.

 करवीर पोलिसांची कारवाई; गावठी रिव्हॉल्वरसह आरोपी जेरबंद

१.७० लाखांचा मुद्देमाल जप्त; गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई.

----------------------

शशिकांत कुंभार.

----------------------

कोल्हापूर, दि. २८ मार्च २०२६ :

करवीर पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत म्हालसवडे (ता. करवीर) येथून एका इसमाकडून बेकायदेशीर गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर जप्त केले आहे. या कारवाईत एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पंढरीनाथ श्रीपती पाटील (वय ५०, रा. म्हालसवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष अर्जुन सरवडेकर यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवली होती. तपासादरम्यान आरोपीने त्याच्याकडील गावठी रिव्हॉल्वर हा स्वतःच्या हिरो आय-स्मार्ट (क्र. MH-09-DR-7300) मोटरसायकलच्या उजव्या बाजूच्या पॅनेलमध्ये लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून संबंधित मोटरसायकलची तपासणी केली असता १ लाख १० हजार रुपये किमतीचा गावठी रिव्हॉल्वर व सुमारे ६० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन आयपीएस अधिकारी आरांक्षा यादव व पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शंकर कळकुटे तसेच पोलीस कर्मचारी राहुल देसाई, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, अविनाश कांबळे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण आदींचा सहभाग होता.

अटक आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर कळकुटे करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.