श्रीरामनवमी निमित्त सांगलीत वाहतूक बंदी आदेश
श्रीरामनवमी निमित्त सांगलीत वाहतूक बंदी आदेश.
-------------------------------------
मिरज तालुका :-प्रतिनिधी राजु कदम.
----------------------------------------
श्रीरामनवमी उत्सवानिमित्त सांगली शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने वाहतूक बंदीचे आदेश जारी केले आहेत. दि. २६ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
राम नवमी उत्सव शांततेत व सुरक्षित पार पडावा यासाठी सांगली पोलीस यांनी हा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
राममंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर लहान मुले, महिला व नागरिकांची गर्दी होत असल्याने कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
बंदी लागू असलेले रस्ते :
काँग्रेस भवन चौक ते राममंदिर चौक, कर्मवीर चौक ते राममंदिर चौक, तसेच सिव्हिल हॉस्पिटल चौक ते राममंदिर चौक या मार्गांवर व राममंदिरकडे येणाऱ्या सर्व जोडरस्त्यांवर वाहतूक बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग :
वाहनधारकांसाठी कॉलेज कॉर्नर, आपटा पोलीस चौकी, काळी खण, पुष्पराज चौक, स्टेशन चौक, एस.टी. स्टँड, कर्मवीर चौक आदी मार्गांद्वारे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

No comments: