Header Ads

कौलव पोटनिवडणुकीत एकनाथ कुंभारांचा दणदणीत विजय; १६५ मतांनी प्रतिस्पर्ध्यांवर अटीतटीच्या लढतीत दादासाहेब पाटील यांच्या आघाडीची सरशी; गावात जल्लोष.

 कौलव पोटनिवडणुकीत एकनाथ कुंभारांचा दणदणीत विजय; १६५ मतांनी प्रतिस्पर्ध्यांवर अटीतटीच्या लढतीत दादासाहेब पाटील यांच्या आघाडीची सरशी; गावात जल्लोष.

--------------------------------------

राधानगरी | प्रतिनिधी विजय बकरे.

---------------------------------------

कौलव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अटीतटीच्या झालेल्या लढतीत कै. दादासाहेब पाटील आघाडीचे उमेदवार एकनाथ कुंभार यांनी १६५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केला. स्थानिक राजकारणात प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या कुंभार यांनी अखेरपर्यंत आपले वर्चस्व कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

मतमोजणीत एकनाथ कुंभार यांना एकूण १४०५ मते मिळाली, तर भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील (कौलवकर) व सदाशिवराव चरापले यांच्या आघाडीचे उमेदवार साताप्पा (बंटी) पाटील यांनी १२४० मते मिळवत निकराची झुंज दिली. चंद्रकांत दादा पाटील गटाचे शशिकांत पाटील ५६१ मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

या निवडणुकीत गावातील सर्व प्रमुख आघाड्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम राबवली होती. निकाल जाहीर होताच दादासाहेब पाटील आघाडीच्या समर्थकांनी गावात जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.

एकनाथ कुंभार यांच्या विजयामुळे कौलवच्या स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची चर्चा रंगू लागली आहे.

 श्री एकनाथ कुंभार सरपंच पदी निवड झाल्याबद्दल फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेल च्या वतीने सरपंच एकनाथ कुंभार यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

No comments:

Powered by Blogger.