Header Ads

कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्वस्था उघड; सभापती शीतल यादव यांची अचानक भेट, कारवाईचा इशारा.

 कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्वस्था उघड; सभापती शीतल यादव यांची अचानक भेट, कारवाईचा इशारा.

-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 किशोर जासूद

-------------------------------

 : जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती शीतल यादव यांनी कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आज अचानक भेट देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान आरोग्य केंद्रातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने प्रशासनातील निष्काळजीपणा उघड झाला असून केंद्राची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले.

पाहणीवेळी केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. स्वच्छतेचा अभाव, दुर्लक्षित सुविधा आणि एकूणच व्यवस्थेतील ढिसाळपणा स्पष्टपणे दिसून आला. तसेच रेकॉर्ड तपासणीदरम्यान कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सभापती शीतल यादव यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ जाब विचारत आरोग्य सेवेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा दिला. तसेच कामकाजात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रविण यादव यांनी आपल्या कार्यकाळात या आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या निधीची आठवण करून देत, एवढा निधी उपलब्ध असूनही केंद्राची अशी दुर्दशा असणे खेदजनक असल्याचे नमूद केले. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

No comments:

Powered by Blogger.