कारागीरांना चालना देण्यासाठी शासनाने पुढे यावे – काडसिद्धेश्वर स्वामीजी.
कारागीरांना चालना देण्यासाठी शासनाने पुढे यावे – काडसिद्धेश्वर स्वामीजी.
----------------------------
कोल्हापूर : प्रतिनिधी
----------------------------
सिद्धगिरी कारागिरी महाकुंभाची सांगता; ४-५ लाखांचा प्रतिसाद.
कणेरी येथील सिद्धगिरी संस्थान मठात आयोजित कारागिरी महाकुंभाची शनिवारी उत्साहात सांगता झाली. या महोत्सवाला पाच दिवसांत सुमारे ४ ते ५ लाख नागरिकांनी भेट दिली.
समारोप प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी कारागीरांच्या उत्थानासाठी शासनाने ठोस पावले उचलून त्यांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. पारंपरिक व्यवसाय करणारे लोहार, विणकर यांसारखे अनेक कारागीर काळाच्या ओघात नामशेष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाल्यास ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, समरजित घाटगे, नविद मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते. आबिटकर यांनी कणेरी मठावर होणाऱ्या उपक्रमांमुळे भारतीय संस्कृतीला चालना मिळत असल्याचे सांगितले.
महाकुंभात १७ राज्यांतील सुमारे २०० कारागीर सहभागी झाले होते. एकूण १५० स्टॉल्स उभारण्यात आले होते. अनेक कारागिरांच्या वस्तूंची विक्रमी विक्री झाली. तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रकल्प स्पर्धेत राजाराम बापू तंत्रनिकेतन, ईश्वरपूर प्रथम क्रमांकावर राहिले.
सिद्धगिरी संस्थान मठ व पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान हा उपक्रम पार पडला.

No comments: