छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
----------------------------इचलकरंजी प्रतिनिधी.
लखन जाधव.
---------------------------
इचलकरंजी: संयुक्त कबनूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रत्नाप्पाण्णा कुंभार चौक, कबनूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावाने पार पडला.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थितांनी मनोभावे दर्शन घेतले. कार्यक्रमादरम्यान शिवप्रेम जागृत करत स्वराज्य, शौर्य आणि प्रेरणादायी विचारांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: