Header Ads

कोल्हापुरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; न्यू पॅलेस परिसरातील थरार......

 कोल्हापुरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; न्यू पॅलेस परिसरातील थरार......

--------------------

कोल्हापूर प्रतिनिधी.

शशिकांत कुंभार .

----------------------

कोल्हापूर: शहरातील न्यू पॅलेस रमणमळा परिसरात एका भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत गौतम राजाराम गायकवाड यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सारिका गायकवाड या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास घडला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सारिका गायकवाड आणि त्यांचे पती गौतम गायकवाड हे आपल्या मोपेडवरून (क्र. MH-09-EC-0110) बँकेचे काम उरकून सेंट झेवियर्स स्कूल ते मेरीवेदर ग्राउंड दरम्यानच्या रस्त्यावरून जात होते. रस्ता ओलांडत असताना, कसबा बावड्याकडून भरधाव वेगाने आलेल्या एका यामा कंपनीच्या मोटारसायकलने (क्र. MH-09-HB-8336) त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली.

अपघातानंतर चालक पसार

या भीषण धडकेत दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर संबंधित अज्ञात दुचाकी चालकाने जखमींना कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. उपचारादरम्यान गौतम गायकवाड यांचा मृत्यू झाला.

पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये (कलम १०५, २८१, १२५(अ), १२५(ब) व १८४, १३४(अ)(ब)) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास अधिकारी: सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत काकडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दाखल अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

No comments:

Powered by Blogger.