Header Ads

बांबवडेतील सोनार लाईनमध्ये पहाटे चोरी; दोन दुकानांतून १.१० लाखांचा ऐवज लंपास, तिसऱ्या दुकानात प्रयत्न

 बांबवडेतील सोनार लाईनमध्ये पहाटे चोरी; दोन दुकानांतून १.१० लाखांचा ऐवज लंपास, तिसऱ्या दुकानात प्रयत्न.

----------------------------------

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते 

--------------------------------------

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील सोनार लाईन परिसरात पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सलग तीन सराफा दुकानांना लक्ष्य करत खळबळ उडवून दिली. कटावणीच्या साहाय्याने दुकानांचे शटर उचकटून चोरट्याने दोन दुकानांतून सोन्या-चांदीचे दागिने व सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला, तर एका दुकानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने गणेश ज्वेलर्स आणि रत्नाई ज्वेलर्स या दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यामध्ये सुमारे ५० हजार रुपये किमतीचे चांदीचे तीन पैंजण जोड, ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट तसेच ५ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा माल चोरून नेण्यात आला.

तसेच राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानाचेही शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तेथून चोरी करण्यात चोरट्याला यश आले नाही.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिरसाट पुढील तपास करत आहेत. शाहूवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या धाडसी चोरीचा तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

No comments:

Powered by Blogger.