Header Ads

भुदरगडमध्ये विविध शासकीय योजनांतील बोगस लाभार्थ्यांची "चौकशी करा, भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील

 भुदरगडमध्ये विविध शासकीय योजनांतील बोगस लाभार्थ्यांची

"चौकशी करा, भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील

_______________________

कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.

-----------------------------------

भुदरगड तालुक्यातील विविध शासकीय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून, या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी, भुदरगड तालुका पंचायत समिती चे गट विकास अधिकारी शेखर जाधव यांना निवेदनाद्वारे केली आहे.

भुदरगड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी भुदरगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या जवाहर विहीर योजना व पंतप्रधान आवास योजना या महत्त्वाच्या योजनांमध्ये बोगस लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचा संशय आहे. प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवून अपात्र व्यक्तींना लाभ देण्यात आल्यास हा गंभीर अन्याय असून शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात संबंधित लाभार्थ्यांची सखोल चौकशी करून पात्रता तपासावी, दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी ठाम मागणी मनसेने केली आहे.

याचबरोबर, तालुक्यातील शेती पानंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा मुद्दाही मनसेने उपस्थित केला आहे. या अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्रशासनाने तत्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे भुदरगड तहसीलदार कार्यालयाकडे करण्यात आली असून अशोकराव पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, 'जर या सर्व प्रकरणांची तातडीने चौकशी करून योग्य कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल आणि जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवला जाईल. 'या निवेदनामुळे भुदरगड पंचायत समिती व तहसीलदार कार्यालय ही दोन कार्यालय आता काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.