Header Ads

आंबा येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट..

आंबा येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट..

----------------------------------

 मलकापूर प्रतिनिधी 

रोहित पास़ते.

------------------------------------

शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील कोलतेनगर येथे १९ वर्षीय युवकाने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सारंग सखाराम कस्तुरे (वय १९, रा. कोलतेनगर, आंबा) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याने नेमके कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच त्याचा मोठा भाऊ हर्षद कस्तुरे यांनी सारंग याला तातडीने पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबा येथे नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा तपास करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस कर्मचारी घोसाळकर व कुंभार करत आहेत.

दरम्यान, अल्पवयीन वयातील युवकाच्या मृत्यूमुळे कोलतेनगर परिसरात शोककळा पसरली

No comments:

Powered by Blogger.