ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना, अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
ओतुर पोलीस स्टेशन हद्दीतील ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना, अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज.
ओतुर(ता.जुन्नर )पोलीस स्टेशन हद्दीतील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन, एन एच आय व सेव लाईफ फाउंडेशन यांनी एकत्रितपणे पावले उचलली आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या नेतृत्वाखाली ओतुर हद्दीतील धोकादायक 'ब्लॅक स्पॉट'ची संयुक्त पाहणी करण्यात आली. यावेळी सेव लाईफ फाउंडेशचे ऋेयश एरंडे व चेतन दोडामणी, तसेच एन एच आय चे शिवशंकर टेलामनी व मयुर औटी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान अपघातांची मुख्य कारणे व रस्ता सुरक्षेतील त्रुटी यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये योग्य ठिकाणी साईन बोर्ड, रम्बल स्ट्रिप, स्पीड ब्रेकर, ब्लिंकर लाईट बसवणे तसेच रस्त्याच्या अभियांत्रिकी दोषांमध्ये सुधारणा करणे या उपाययोजनांचा समावेश आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी माहिती दिली की,एन एच आय व सेव लाईफ फाउंडेशन यांच्या समन्वयाने योग्य त्या सूचनांसह लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल व नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल.ओतुर पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

No comments: