Header Ads

टर्न घेताना चारचाकीचा ताबा सुटला; चारचाकी गाडी घुसली थेट घरात....

 टर्न  घेताना चारचाकीचा ताबा सुटला; चारचाकी गाडी घुसली थेट घरात घराचे खूप मोठे नुकसान,,सुदैवाने जीवित हानी नाही

--------------------------------------------
कुपवाड मिरज :-प्रतिनिधी राजु कदम.
-------------------------------------------

मिरज शहरातील मंगळवार पेठ येथील बॉम्बे स्टार बेकरीसमोर आज सकाळी अंदाजित 9 ते  9.30 च्या दरम्यान एक धक्कादायक अपघात घडला. टर्न घेत असताना चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने प्रथम एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर थेट एका घरात घुसली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठ परिसरातील बॉम्बे स्टार बेकरीसमोर हा अपघात घडला. चारचाकी वाहन वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन भरधाव वेगाने पुढे गेले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत वाहन थेट घरात घुसले.

या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरमालक इम्तियाज सौदागर यांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस तसेच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, घरमालक इम्तियाज सौदागर यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली असून, झालेल्या नुकसानीचा योग्य पंचनामा करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे

No comments:

Powered by Blogger.