यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या वतीने राशिवडे येथे वृक्षारोपण.
यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या वतीने राशिवडे येथे वृक्षारोपण
कौलव / प्रतिनिधी बदलत्या निसर्गाने मानवाला विचार करण्याची वेळ आणली आहे, मानवाने आपल्या महत्वकांक्षेसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोढ केल्याने पावसाच्या अनियमितपणात वाढ झाली आहे "वृक्षारोपण वृक्षसंवर्धन, एक वृक्ष आरोग्य स्वास्थ " या संकल्पनेतुन चैतन्य संस्था राजगुरूनगर प्रेरीत, सारथी महसंघ अंतर्गत, यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या वतीने संघाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करून संगोपन करण्याचा संकल्प केला याची सुरवात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन राशिवडे बु ता राधानगरी येथे संविधान गाव विकास समितीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात तसेच विभाग वार्षिक सभा घेण्यात आली यावेळी संघाच्या व्यवस्थापिका सुजाता कलिकते यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे शुध्द हवा, मुबलक आँक्सिजन झाडांच्यामुळे मिळतोय पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन भुजल पातळीत वाढ होते यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावुन जगवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे असे सांगितले यावेळी आंबा, फणस, जांभूळ, चिकू, लिंब अशा प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच विभाग वार्षिक सभेत उपस्थित महिलांनी आपले कलागुण सादर करून मनोरंजन केले या कार्यक्रमाला संघाच्या व्यवस्थापीका सुजाता कलिकते, संघ कार्यकर्त्या वैशाली कांबळे, संघ पदाधिकारी प्रज्ञा कांबळे, विभाग अध्यक्षा पायल कांबळे, सचिव पुजा कांबळे यांच्यासह भिम क्रांती, कन्यारत्न, समता, जयभिम, विश्वरत्न, पंचशिल, आशीर्वाद, जयश्रीराम या बचत गटातील महिला उपस्थित होत्या

No comments: