Header Ads

कुपवाड शहरात १०० फुटी तिरंगा ध्वज व स्व. माजी आ. शरद पाटील स्मृती उद्यानाचे उद्या २४ रोजी पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमीपूजन.

 कुपवाड शहरात १०० फुटी तिरंगा ध्वज व स्व. माजी आ. शरद पाटील स्मृती उद्यानाचे उद्या २४ रोजी पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमीपूजन

~~~~~~~~~~~~~~

कुपवाड : प्रतिनिधी.

~~~~~~~~~~~~~~

शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या १०० फुटी भारतीय तिरंगा ध्वज तसेच कै. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान या महत्त्वाकांक्षी विकासकामांचा भूमीपूजन समारंभ सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता, मेन रोड, कुपवाड येथे आयोजित करण्यात आला आहे.


या भूमीपूजन समारंभास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तसेच महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.


कार्यक्रमास खासदर विशाल पाटील, विधानपरिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्यासह माजी खासदार राजु शेट्टी, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, शेखर इनामदार, पद्माकर जगदाळे, पृथ्वीराज पवार, समित कदम, नानाभाऊ शेवाळे, जनता दल प्रदेशाध्यक्ष तसेच उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विविध पक्षांचे गटनेते, नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या विविध उपसमित्यांचे


पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.


सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कुपवाड शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या एका ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि देशभक्तीची स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने उपमहापौर गजानन मगदूम यांच्या विकास निधीतून सुमारे १.५० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या भारतीय १०० फुटी तिरंगा ध्वज व स्व. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवारी होत आहे.


१०० फुटी तिरंगा केवळ आकाशात फडकणारा ध्वज नसेल; तो कुपवाडच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची, देशभक्तीची आणि राष्ट्रनिष्ठेची सदैव प्रेरणा देणारी निशाणी असेल. कुपवाड शहराच्या विकासामध्ये


१०० फुटी तिरंगा ध्वज हा देशभक्तीचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरणार असून, स्व. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान हे नागरिकांसाठी आकर्षक व पर्यावरणपूरक सार्वजनिक स्थळ म्हणून विकसित होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे कुपवाड शहराच्या सौंदर्यात आणि विकासात निश्चितच भर पडणार आहे.


या महत्त्वपूर्ण विकासकामांच्या भूमीपूजन समारंभास कुपवाड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन स्व. मा.आ. शरद पाटील स्मारक समिती यांचेवतीने करण्यात आले आहे. यावेळी नरसगोडा पाटील, सरोज शरद पाटील, दादासाहेब पाटील, प्रणव पाटील, मोहन जाधव, एस.पी पाटील, अरूण रूपनर, हणमंत सरगर, विजय खोत, भाऊसाहेब पाटील, रमेश सायमोते उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.