सहकारातून सहकार वाढला पाहिजे . सहकारात कागल तालुका अग्रेसर - माजी खास संजय मंडलिक .
सहकारातून सहकार वाढला पाहिजे . सहकारात कागल तालुका अग्रेसर - माजी खास संजय मंडलिक .
मुरगूड / जोतीराम कुंभार
~~~~~~~~~~~~~~~~~~
जिल्हाभर सहकाराचे जाळे वाढत आहे . सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्थांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे सहकारातून सहकार वाढला पाहिजे सहकारात कागल तालुका अंग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले .
येथील राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली . या सभेत माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रमुख मार्गदर्शन केले . सभाध्यक्षस्थानी सभापती दत्तात्रय सोनाळकर होते .
राजर्षि शाहू पतसंस्थेची वार्षिक सभा येथील श्रीराम मंगल कार्यालयात नुकतीच पार पडली . प्रारंभी संस्थापक दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन ॲड विरेंद्र मंडलिक यांच्याहस्ते करण्यात आले . उपसभापती रविंद्र ढेरे यांनी स्वागत केले तर तज्ञ संचालक एन वाय पाटील यांनी प्रास्ताविक केले .
संस्थेचे जनरल मॅनेजर ज्ञानदेव पाटील यांनी अहवाल वाचन केले . अहवाल सालात संस्थेकडे १२३ कोटी ३२ लाखाच्या ठेवी जमा असून ७९ कोटी ८० लाखाचे कर्जवाटप केले आहे . २कोटी १५ लाख २४ हजार ८९८ इतका निव्वळ नफा झाल्याचे व एकूण ११७० कोटी १५ लाखाचा व्यवसाय केल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून सन्मानीत करण्यात आले तर गडहिंग्लज बाजार समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल विलास कांबळे यांचा व मंडलिक साखर कारखान्याचे नूतन संचालक प्रधान भोजे भगवान पाटील व अनिल सिध्देश्वर यांचा सत्कार करण्यात आला .
सभेत विविध उपस्थित प्रश्नावर मारुती रावण ' दिगंबर परीट ' जयसिंग भोसले , राजेश गोधडे सखाराम सावर्डेकर आनंदा पाटील रमेश पाटील व पांडुरंग मेंडके यांनी चर्चेत सहभाग घेतला . संचालक नारायण मुसळे यांनी आभार मानले .

No comments: