गांधीनगर, वळीवडे-चिंचवाड परिसरातील कचरा समस्येवर रिपब्लिकन पीपल्स पार्टी आक्रमक; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.
गांधीनगर, वळीवडे-चिंचवाड परिसरातील कचरा समस्येवर रिपब्लिकन पीपल्स पार्टी आक्रमक; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~गांधीनगर | प्रतिनिधी : उदय साळुंखे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गांधीनगर, वळीवडे आणि चिंचवाड परिसरात वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येविरोधात रिपब्लिकन पीपल्स पार्टी आक्रमक झाली असून, पक्षाचे गांधीनगर शहराध्यक्ष सागर कोलप यांनी व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीकडे अनेकदा तोंडी तक्रारी करूनही कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नसल्याचा आरोप सागर कोलप यांनी केला. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे सांगत त्यांनी तातडीने कचऱ्याचा उठाव करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली.
लवकरात लवकर या समस्येवर ठोस उपाययोजना न झाल्यास रिपब्लिकन पीपल्स पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सागर कोलप यांनी दिला आहे. परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

No comments: