Header Ads

उंचगावचे ज्येष्ठ स्क्रॅप व्यावसायिक तथा मदिना मस्जिदचे अध्यक्ष इसाक हबीब पखाली यांचे निधन

 उंचगावचे ज्येष्ठ स्क्रॅप व्यावसायिक तथा मदिना मस्जिदचे अध्यक्ष इसाक हबीब पखाली यांचे निधन.

उंचगाव | प्रतिनिधी.

करवीर तालुक्यातील उंचगाव येथील ज्येष्ठ स्क्रॅप व्यावसायिक तसेच मदिना मस्जिदचे अध्यक्ष इसाक हबीब पखाली (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने उंचगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

इसाक पखाली यांनी अनेक वर्षे स्क्रॅप व्यवसायातून आपला वेगळा ठसा उमटवला. त्याचबरोबर मदिना मस्जिदचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांना मानाचे स्थान होते.

त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे आणि असा मोठा परिवार आहे.

उंचगाव परिसरातील नागरिक, व्यापारी व विविध सामाजिक-धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

No comments:

Powered by Blogger.