गड मुडशिंगी येथे राज्य कर निरीक्षक ( STl) पदी कु. गायत्री जाधव हिची निवड
गड मुडशिंगी येथे राज्य कर निरीक्षक ( STl) पदी कु. गायत्री जाधव हिची निवड.
शशिकांत कुंभार.
------------------------------------
गांधीनगर :- स्पर्धा परीक्षांची हा प्रवास सोपा नसतो यामध्ये अपयश येते निराश येते पण जर तुम्ही जिद्द सोडली नाही तर यश नक्की मिळते मी तरूणांना सांगू इच्छितो की सातप्य ठेवा आणि अपयशाने खचून जाऊ नका.या यशात आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या
त्यागाचा मोठा वाटा आहे.असे उदगार भिमराव गोंधळी रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष यांनी व्यक्त केले.या प्रवासात माझ्या आई -वडिलांनी मला खूप साथ दिली त्यानी मला नेहमी धार दिला.त्याच्या कष्टाशिवाय मी इथे पोहोचू शकलो नसतो आज माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे.राज्य कर निरीक्षक पदी माझी निवड झाली आहे.या यशाबद्दल तुम्ही रिपब्लिकन सेना करवीर तालुका वतीने माझा सत्कार केलात याबद्दल मी तुम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो.हा सत्कार फक्त माझ्या नाही तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या प्रत्येकाचा आहे. असं मतं कु. गायत्री जाधव यांनी व्यक्त केले...!
त्यावेळी उपस्थित
अर्जुन कांबळे करवीर सचिव, शिवाजी कांबळे. गणेश कांबळे, अर्जुन गोंधळी करवीर महासचिव, सारंग कांबळे,राजू जाधव, संदिप गोंधळी, मनोहर कांबळे, सुशांत करपे, अमोल कांबळे, दिपक डोणे,उपस्थित होते

No comments: