७ गुन्ह्यांचा परागंदा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
७ गुन्ह्यांचा परागंदा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.~~~~~~~~~~~~~~~~
सांगली.:- सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडाकेबाज कारवाई करत तब्बल ७ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून ४० ग्रॅम वजनाचे सुमारे ६.०२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
आष्टा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एलसीबीच्या पथकाला आरोपी विशाल ऊर्फ मुक्या भिमराव पवार (वय ३५, रा. बहादुरवाडी, ता. वाळवा) याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून २ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीकडून चोरीतील दोन सोन्याच्या नक्षीदार बांगड्या हस्तगत करण्यात आल्या. जप्त मुद्देमालात १९.९५९ ग्रॅम आणि २०.२२५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ६,०२,७६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीच्या पथकाने केली. तपासात सायबर पोलिसांचाही सहभाग होता.
पोलिसांच्या या कारवाईमुळे आष्टा परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments: