१,१५० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस रंगला
१,१५० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस रंगला
कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये खेळाडूंची चमक; ४०० मीटर धावण्यात सातारा संघ प्रथम.
सांगली | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगलीतील शहीद अशोक कामटे क्रीडानगरी, पोलीस मुख्यालय मैदान, विश्रामबाग येथे सुरू असलेल्या ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस उत्साहात पार पडला. या स्पर्धेत सहा घटकांतील एकूण १,१५० खेळाडू सहभागी झाले आहेत.
वेटलिफ्टिंग, लांब उडी, गोळाफेक, ४०० मीटर आणि १,५०० मीटर धावण्याच्या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी कौशल्य दाखवले. सांघिक ४०० मीटर धावण्यात पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत सातारा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, हँडबॉल आणि हॉकीचे सामनेही रंगले.
२५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या या स्पर्धा सकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहेत. नागरिकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे

No comments: