कुपवाड एमआयडीसीत डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी!
कुपवाड एमआयडीसीत डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी!
वर्षा इंडस्ट्रीजसमोरील पाण्याच्या टाकीजवळ अपघात; पै चंद्रहार पाटील जिवरक्षक टीम आणि पोलिसांची तत्परता.
कुपवाड | मिरज प्रतिनिधी : राजू कदम
कुपवाड : कुपवाड शहरातील एमआयडीसी परिसरात वर्षा इंडस्ट्रीजसमोरील पाण्याच्या टाकीजवळ डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच पै. चंद्रहार पाटील जिवरक्षक टीमनेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
पोलिस कर्मचारी आणि जिवरक्षक टीमच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.

No comments: