Header Ads

मिरज ग्रामीण पोलिसांचा आंतरराज्यीय शेळी-बोकड चोरट्यांवर घाव! दोन आरोपी जेरबंद; पाच गुन्ह्यांची उकल, २.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 मिरज ग्रामीण पोलिसांचा आंतरराज्यीय शेळी-बोकड चोरट्यांवर घाव! दोन आरोपी जेरबंद; पाच गुन्ह्यांची उकल, २.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त कर्नाटकातील दोघांना अटक; चोरीसाठी वापरलेली दुचाकीही जप्त.

मिरज | प्रतिनिधी

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शेळी-बोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत कर्नाटकातील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणत एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिवानंद नागाप्पा सनदी (वय २३) आणि राजू चिकय्या सनदी (वय ३२, दोघेही रा. कंचकरवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिरज ग्रामीण हद्दीतील आरग, बेडग, सांबरवाडी, व्यंकोचीवाडी आणि गुंडेवाडी परिसरातून शेळ्या-बोकडांची चोरी झाल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या जनावरांच्या विक्रीतून मिळालेली १ लाख ५ हजार रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली १ लाख २० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी जप्त केली.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना २६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.