Header Ads

कळे येथे'भव्य कर ओके गाण्याची स्पर्धा' रंगली; विजेत्यांचा दणक्यात सत्कार

 कळे येथे'भव्य कर ओके गाण्याची स्पर्धा' रंगली; विजेत्यांचा दणक्यात सत्कार.



कळे प्रतिनिधी :

साईश मोळे

९५९५३१६२६६


कै. सावित्री नामदेव पाखरे (आई - आबा) यांच्या स्मरणार्थ आयोजित 'भव्य करओके गाण्याची स्पर्धा' रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळ शंकर हॉल, आसगाव येथे मोठ्या दिमाखात पार पडली.

या स्पर्धेचे प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री गोविंद पाखरे (ऑर्केस्ट्रा, चित्रपट, गायक) यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमास बाळ शंकर मंगल कार्यालयाचे मालक मा. श्री संदीप पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी कळे पोलीस स्टेशनचे पी.आय. मा. श्री दीपक कदम साहेब, मा. सरपंच श्री सुभाष पाटील हे बक्षीस वितरणास हजर होते. तसेच कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष मा. श्री सर्जेराव पाटील (भाऊ) व सर्व पाखरे परिवार व सर्व स्पर्धक हजर होते. राज्य पुरस्कार प्राप्त राजर्षी शाहू मित्र मंडळाचे अध्यक्ष मा. श्री अनिल दंताळ साहेब हे देखील उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मा. श्री संजीव पाटील (कोल्हापूर) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन मा. श्री सचिन कांबळे सर यांनी केले. या कार्यक्रमास कोल्हापूर, सांगली, राधानगरी, कळे परिसरातील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रथम बक्षीस - रु. ७००१ + ट्रॉफी + प्रमाणपत्र :

मा. श्री अर्जुन लोंढे (सांगली) यांना श्रीमती कमल धोंडीराम सुतार (रा. कळे) व सौ. श्री सचिन रघुनाथ मांडरे (रा. कोल्हापूर) यांच्याकडून

द्वितीय बक्षीस - रु. ५००१ + ट्रॉफी + प्रमाणपत्र :

मा. सौ. स्वप्नाली सुतार (राधानगरी) यांना सौ. श्री अनंतराव नामदेव पाखरे (रा. कळे) यांच्याकडून

*तृतीय बक्षीस - रु. ३००१ + ट्रॉफी + प्रमाणपत्र :

श्री विनायक लोखंडे (रा. रुकडी) यांना श्रीमती शालन भाऊसो उरुणकर (रा. दत्तवाड) व श्रीमती सुनंदा अनंत कालेकर (रा. कळे) यांच्याकडून


*उत्तेजनार्थ बक्षीस - रु. १००१ + प्रमाणपत्र :

श्री आदित्य बल्लाळ (रा. कोल्हापूर) याला मा. श्री अनिल बाबुराव दंताळ यांच्याकडून देण्यात आले.

यावेळी सर्व विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक, निर्माता, दिग्दर्शक, गायक मा. श्री गोविंद पाखरे (ऑर्केस्ट्रा सुर झंकार, कळे) यांनी सर्वांचे आभार मानले.

  हिंगोली येथे झालेल्या राष्ट्रीय काव्सत्स्पर्धकांचा पी.जी.पाटील सर (चिंचवडे) यांना राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल  या कार्यक्रमात त्यांचा सत्स्पर्धकांचाज्ञ आला.श्री. अनंतराव जोशी (चरणकर)

 समस्त पाखरे परिवार व ग्रामस्थ, कळे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

No comments:

Powered by Blogger.