Header Ads

तिरपण येथे ऊस ट्रॉलीचा भीषण अपघात टळला, विजेचा खांब शेडवर कोसळला

 तिरपण येथे ऊस ट्रॉलीचा भीषण अपघात टळला, विजेचा खांब शेडवर कोसळला

पन्हाळा- माधुरी मस्कर 

तिरपण (ता. पन्हाळा)  येथून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर फुटल्याने ऊसाने भरलेली ट्रॉली मुख्य रस्त्याशेजारील विजेच्या खांबावर पडल्याची घटना तिरपण येथे  सायंकाळी सात वाजता घडली. सुदैवाने यावेळी लाईट बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, माजनाळ येथील ट्रॅक्टर ऊस घेऊन जात असताना अचानक ट्रॉलीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ऊसाने भरलेली ट्रॉली रस्त्याशेजारील विजेच्या खांबावर जाऊन पडली. या धडकेत विजेचा खांब शेजारी असणाऱ्या पत्र्याच्या शेडवर कोसळला.

खांब शेडवर पडल्याने आत असणाऱ्या लाकडी तेल घाण्यात साठवलेला तेलाचा गंज पडून मोठ्या प्रमाणात तेलाची नासाडी झाली.तर शेडचेही नुकसान झाले आहे.

घटना घडली त्यावेळी वीजपुरवठा बंद असल्याने विजेचा धक्का लागणे, आग लागणे यासारखा मोठा अनर्थ टळला. अन्यथा जीवितहानी होण्याची शक्यता होती.

या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

No comments:

Powered by Blogger.