1 लाख 75 हजारांची लाच स्विकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,कनिष्ठ अभियंता,लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.
1 लाख 75 हजारांची लाच स्विकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,कनिष्ठ अभियंता,लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. ---------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राहुल कांबळे जयसिंगपुर/प्रतिनिधी ---------------------------------------------- बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे पाठवणे करीता खाजगी इसमाकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच स्विकारले प्रकरणी शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि लिपिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतले.या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरोळ नगपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत मारुती हराळे व.व.33 सद्या रा.शिरोळ, जि. कोल्हापूर,मुळ भिलवडी ता.पलूस,जि.सांगली,कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर व.व. 28 सद्या रा.जयसिंगपूर, ता.शिरोळ मूळ रा.उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद,शिरोळ नगरपरिषदेचे लिपिक सचिन तुकाराम सावंत राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर तसेच खाजगी इसम अमित तानाजी संकपाळ व.व.42 राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत. बांधकाम परवाना फा...