मुलांच्या संवेदनशील मनाला जपा - माधुरी शानभाग.
मुलांच्या संवेदनशील मनाला जपा - माधुरी शानभाग. ----------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------- संजय साबळे यांच्या 'बाबांना समजून घेताना ' व 'शाळा विद्यार्थी आणि मी ' या पुस्तकांचे प्रकाशन.. येथील दि न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री संजय साबळे यांनी मुलांकडून लिहून संपादित केलेल्या 'बाबांना समजावून घेताना ' व शाळा, विद्यार्थी आणि मी 'या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध साहित्यिका माधुरी शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माधुरी शानभाग म्हणाल्या की, "शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्व अनुभव लिहिण्याची संधी दिली पाहिजेत. आपले अनुभव त्यांनी व्यक्त केले तर भावी जीवनात ते नक्की यशस्वी होतील. आपल्या भावना ,वेदना शब्दात व्यक्त करणे ही कला आहे आणि ती विद्यार्थीदशेतच जोपासली पाहिजे. यातूनच अशा प्रकारचे साहित्य निर्माण होते. " पुस्तकाचे संपादक संजय साबळे म्हणाले , "विद्यार्थ्यांच्या लिहित्या हातांना बळ दिले तर