20 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह एकाला अटक महसूल विभागात मोठी खळबळ.

  20 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह एकाला अटक महसूल विभागात मोठी खळबळ.

----------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------

जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी 20 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह एक जण लाच लुचपतच्या जाळ्यात.

हातकणंगले तालुक्यातील साजणी तसेच तिळवणी या सज्जाचे तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे यांच्यासह एकाला आज 20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत प्राप्त तक्रारीनुसार खरेदी केलेल्या जमिनीची फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे यांनी 20 हजाराची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत विभागामार्फत पडताळणी करण्यात आली. त्यानुसार संबंधित तलाठ्याला आणि त्याला मदत करणाऱ्या मदतनीसला आज 20 हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. सदरची धडक कारवाई पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाच्या पोलिसांनी केली.

Comments