वाई "जीवनात संवेदनशील निरिक्षणातून स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडते.
वाई "जीवनात संवेदनशील निरिक्षणातून स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडते. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र वाई प्रतिनिधी कमलेश ढेकाणे ------------------------------ यशस्वी होता येते, या करिता सिंहाप्रमाणे आत्मविश्वास पूर्वक लक्ष्याचा पाठलाग केला पाहिजे", असे विचार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, कोल्हापुर विभागाचे सहसचिव श्री. डी. एस. पोवार यांनी मांडले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले होते. यावेळी व्यासपीठावर सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, संचालक केशवराव पाडळे, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य विवेक सुपेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कोकरे व क्रीडा विभाग प्रमुख श्री. सचिन चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. श्री. डी. एस. पोवार पुढे म्हणाले " विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी-निवडी व कौशल्ये ओळखून जीवनाचे लक्ष निश्चित करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गोष्टी लक्षात आणून देण्यास...