लोहा वळण रस्त्यालगत आयशर उलटला ; वाहनाचे आणि द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान.
लोहा वळण रस्त्यालगत आयशर उलटला ; वाहनाचे आणि द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र लोहा प्रतिनीधी अंबादास पवार --------------------------------- मागील दोन ते तीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे रस्ता काम सुरू असून लोहा शहरातील नांदेड ते लातूर महामार्गावरील लोहा वळण रस्त्याचे अर्धे काम पूर्ण झाले, मात्र अर्धे काम ठप्प पडल्याने लातूर कडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना उड्डाण पुलावरून जायचे का सर्व्हिस रस्त्याने जायचे हे समजण्या अगोदरच समोर ठेवलेल्या बॅरीकेटवर किंवा बाजूला वाहने उलटून अपघात होत असल्याचे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. सांगली जिल्ह्यातून नागपूर कडे द्राक्ष घेवून जाणाऱ्या आयचर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने तो समोरील बॅरीकेटवर अदळण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला उलटला. अयचार मधील द्राक्षे रस्त्यालगत शेतात विखुरल्याने वाहनासह द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने आयशर मधील दोनही चालक बालंबाल बचावले. सदरील घटना दि. ३१ मार्च रोजी र...