१ जुलै २०२४रोजी पासुन देशात नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी सुरू .
१ जुलै २०२४ रोजी पासुन देशात नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी सुरू . ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे. ---------------------------- भारत सरकार व देशातील नागरीक, लोकप्रतिनिधी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विधीज्ञ, सेवानिवृत्त न्यायाधिश, पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली भारतामध्ये १५० वर्षांपूर्वी निर्माण केलेले कायदे वसाहतवादी कायद्यांपासुन भारताला मुक्त करण्यासाठी, तसेच पिडीत व्यक्तीला न्याय व आरोपीस जास्तीजास्त दंड देणे या उद्देशाने देशामध्ये लागु असले भारतीय दंड संहिता १८६० फौजगारी प्रक्रिया संहिता १९७३ व भारतीय पुरावा कायदा १८७२ या कायद्यांमध्ये सुधारणा करुन नविन कायद्याच्या निर्मितीच्या कामाला ऑगस्ट २०१९ मध्ये प्रारंभ करण्यात आले होते . त्याअनुषंगाने जुन्या कायद्यामध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ही तीन विधेयके संसदेमध्ये सादर केले होते. सदरचे विधेयक दि. २५/१२/२०२३ रोजी मंजुर झाले आहे. तरी सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की दि. ०१/०७/२०२४ रोजी पासुन...