कर्नाटकाला जोडणार्या इचलकरंजी-शिरदवाड मुख्य रोडवर चर काढल्याप्रकरनी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य.

कर्नाटकाला जोडणार्या इचलकरंजी-शिरदवाड मुख्य रोडवर चर काढल्याप्रकरनी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य. ----------------------------------- कोल्हापूर :प्रतिनिधी ----------------------------------- सध्या पंचगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुन्हा पुराचे पाणी सर्वत्र पसरत चालले आहे. कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी- शिरदवाड रोडवर शनिवारी दि. 28 जुलै 2024 रोजी दुपारचे सुमारास तीन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने विना परवाना रस्ता खुदाई करण्यात आला. रस्त्यावर भली मोठी चर काढून पुराचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडण्यात आले. परिणामी तोडकर मळा, मुजावर पट्टी, ढोले पानंद, बौद्ध विहार, रोहिदास नगर,राणाप्रताप चौक, गणेश मंडळ व इतर परिसर आदि भागात मोठ्या प्रमाणात रात्रीत पुराचे पाणी येऊ लागले. यामुळे भीतीपोटी सदर भागातील अनेक कुटुंबांना रात्रीत स्थलांतर करावे लागले. याप्रकरणी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ते खुदाई करून पाणी सोडण्यात येत असल्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना वरील भागातील...