शिरोलीत वर्चस्ववादातून टोकदार हत्याराने तीन आलिशान गाड्या फोडल्या,तसेच आदमापूर येथे परस्परांवर गोळीबार.
शिरोलीत वर्चस्ववादातून टोकदार हत्याराने तीन आलिशान गाड्या फोडल्या,तसेच आदमापूर येथे परस्परांवर गोळीबार. ---------------------------------- शिरोली प्रतिनिधी अमित खांडेकर ---------------------------------- स्क्रॅप व्यवसायाचे नाव घेतले जात असले तरी नेमके कोणत्या कारणाने टोळी युद्ध भडकत आहे याच्या मुळाशी पोलिसांनी जानेची गरज आहे. पुलाची शिरोली येथे शुक्रवारी रात्री ग्रामपंचायत जवळ राहणाऱ्या माजी उपसरपंच अविनाश कोळी व अभिजीत कोळी यांच्या मालकीच्या दोन आलिशान गाड्या टोकदार हत्याराने फोडल्याची घटना घडली आहे. अभिजित कोळी व अविनाश कोळी हे दोघे भाऊ शिरोली ग्रामपंचायत जवळ राहतात. या दोघांचा स्क्रॅप चा व्यवसाय आहे. तसेच विनायक लाड याचाही स्क्रॅप चा व्यवसाय आहे. या दोघांच्या मध्ये बऱ्याच दिवसापासून व्यवसायावरून व आर्थिक कारणावरून वाद आहे. नागाव येथे सातपुते गॅंगने विनायक लाड वर तलवार हल्ला केला यामध्ये अविनाश व अभिजित कोळी चा हात असल्याने शुक्रवारी रात्री विनायक लाड, अनिकेत लाड व अनिल माने उर्फ जॅकी यांनी अविनाश व अभिजित च्या दारात लावलेल्या एम एच ०९ ०७६४ या फोर्ड ॲस्प...