Posts

Showing posts from January, 2025

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत विद्या मंदिर परखंदळे शाळेचे उल्लेखनीय यश.

Image
  तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत विद्या मंदिर परखंदळे  शाळेचे उल्लेखनीय यश. ---------------------------------------- पन्हाळा प्रतिनिधी   आशिष पाटील  -----------------------------------------  पन्हाळा तालुकास्तरीय स्पर्धा कळे येथील माणिक मल्टीपर्पज हॉल येथे पार पडल्या, उद्घाटन सरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते झाले, प्रास्ताविक श्री शिवाजी मानकर ( गटशिक्षणाधिकारी पन्हाळा ) यांनी केले केंद्रप्रमुख श्री भगवान चौगुले यांनी व कळे केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी नियोजन केले. यामध्ये विद्यामंदिर परखंदळे शाळेने समूहगीत लहान गट व मोठा गट या दोन्ही गटात प्रथम क्रमांक मिळविला, या दोन्ही संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पन्हाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला एकूण सांस्कृतिक दोन्ही गटात दहा प्रकारांमध्ये दोन संघांनी यश प्राप्त केल्याने सर्वत्र परकखंदळे शाळेचे कौतुक होत आहे   या स्पर्धे करता मुख्याध्यापक प्रकाश पाटील, सविता शिपेकर, माधवी पाटील, विश्वास कांबळे, प्रकाश आ.पाटील, शैलजा कडलगे कर, बालाजी मुरुंबे यांचे मार्गदर्शन लाभले.

रोटेरियन्स चांगले वाहतूक मित सुनील गिड्डे.

Image
  रोटेरियन्स चांगले वाहतूक मित  सुनील गिड्डे. ------------------------   ्मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ------------------------  मिरज : येथील रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या वतीने वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील हौसाबाई देवाप्पा कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद शकुंतला रामचंद्र कुंभार ,पोलीस कॉन्स्टेबल चिमा साहेब राजाक्का धनाजीराव चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सतीश विमल चंद्रकांत पाटील  तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील रंजना महादेव गिड्डे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व तिरंगी हार देऊन रोटरी क्लब  ऑफ मिरज चे सचिव डॉक्टर रियाज उमर मुजावर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मिरज अध्यक्ष रवींद्र फडके होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना सुनील गिड्डे म्हणाले की रोटरी क्लबचे सदस्य हे चांगले वाहतूक मित्र आहेत त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने सहकार्य करावे .स्वागत व प्रास्ताविक दंतशल्यचिकित्सक लक्ष्मीकांत घटनट्टी यांनी केले .रोटरी क्लब ची माहिती विजयकुमार कांबळे यांनी दिल...

शिवपुतळ्याची प्रतिष्ठा ही मंडलिक प्रतिष्ठानची जबाबदारी ;ड. वीरेंद्र मंडलिक .

Image
  शिवपुतळ्याची प्रतिष्ठा ही मंडलिक प्रतिष्ठानची जबाबदारी ;ड. वीरेंद्र मंडलिक . ------------------------------------ मुरगूड प्रतिनिधी जोतीराम कुंभार ------------------------------------ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ॲड. मंडलिक यांच्याकडून पाहणी. मुरगूड नगर परिषदेच्या प्रांगणातील अश्वारूढ शिव पुतळ्याची प्रतिष्ठा ही मंडलिक प्रतिष्ठानची नैतिक जबाबदारी आहे. शिवजयंतीनंतर पुतळ्याच्या रंग व कोटींगचे काम करणार असल्याची ग्वाही मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.वीरेंद्र मंडलिक यांनी दिली. मात्र पुतळ्याला तडा गेल्याच्या अफवा पसरून समाजमाध्यमाद्वारे सामाजिक तेढ करून राजकारण करणाऱ्यांची शिवप्रेमी व शिवभक्त नागरीक  गय करणार नाहीत. असा सज्जड इशाराही ॲड. मंडलिक यांनी दिला. मुरगूड नगरपारिषदेच्या प्रांगणात तीन वर्षापूर्वी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली  लोकसहभागातून पालिकेच्या प्रांगणात सुमारे पावणेदोन टन वजनाच्या पंचधातू पासून बनवलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. तर मुरगूड नगर परिषदेने चबुतऱ्याचे बांधका...

लक्ष्मी मंदिर चौकातील स्वयंचलित ट्राफिक सिग्नल चे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते.

Image
  लक्ष्मी मंदिर चौकातील स्वयंचलित ट्राफिक सिग्नल चे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते. ------------------------  मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ------------------------  कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर चौकातील स्वयंचलित ट्राफिक सिग्नल चे उद्घाटन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.  बसवलेल्या स्वयंचलित ट्राफिक सिग्नल मुळे लक्ष्मी मंदिर चौक येथील वाहतूक कोंडी चा प्रश्न सुटणार आहे या मार्गावरील वाहतुकी सुरळीत होईल. यावेळी सांगली जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक श्री मुकुंद कुलकर्णी, श्री सुनील राऊत, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, अध्यक्ष रवींद्र ढंगे , गोपाल (बंड( सरगर, अतुल माने, प्रवीण कुलकर्णी, प्रसाद वळकुंडे, वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच लक्ष्मी मंदिर चौक रिक्षा स्टॉप चे रिक्षा चालक व्यावसायिक नागरिक उपस्थित होते ‌..

बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला चार मृत एक जखमी.

Image
बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला चार मृत एक जखमी. -------------------------  रिसोड प्रतिनिधी  रणजित सिंह ठाकुर  -------------------------  रिसोड : बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चार शेळ्याचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना दिनांक 30 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान रिसोड करडा मार्गावर बिबखेड शेत शिवारामध्ये वसंता देवबा मोरे यांच्या शेतात घडली. याबाबत माहिती अशी की रिसोड येथील वसंता देवबा मोरे यांची रिसोड करडा मार्गावर बिबखेड शिवारामध्ये शेती असून शेतीसह जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे पशुपालन व्यवसाय आहे. यामध्ये गाय बैल म्हैस ऐवजी शेळ्या आहेत. त्यांच्याकडे 15 ते 20 शेळ्या असून दैनंदिन प्रमाणे ते दिनांक 30 जानेवारीच्या रात्री आठ ते साडेआठ वाजता चे दरम्यान आपले सर्व काम आटपून जनावरांना चारापाणी करून आपल्या घराकडे निघून गेले. दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी जेव्हा ते आपल्या शेतामध्ये आले असता त्यांना हा सदर प्रकार दिसून आला.सदर हल्ला बिबट्याने केला असल्याचे शेतकरी वसंता देवबा मोरे यांचे म्हणणे असून शेळ्यांसाठी लावण्यात आलेल्या टीन शेड ची उंची व यामध्ये चांगलाच अंतर असून अन्य कोणताही प्रा...

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम च्या १०० दिवसीय क्षयरोग मोहीमेला कारंजा.खासगी डॉक्टरांचा मोठा सहभाग.

Image
 राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम च्या १०० दिवसीय क्षयरोग मोहीमेला  कारंजा.खासगी डॉक्टरांचा मोठा सहभाग. -------------------------  रिसोड प्रतिनिधी रणजीत सिंह ठाकुर -------------------------  कारंजा - पंचायत समिती *सभागृहात सभा -CME कार्यक्रम संपन्न. : दि.30,राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा मध्ये चालु असलेल्या 100 दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. या करिता खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रमाला डॉक्टर असोशीयेशन  (NIMA) व IMA असोसिएशन कारंजा यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.श्री.परभनकर,कारंजा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे,वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डोणगावकर, डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ.संजय कीटे, केमिस्ट असोसिएश...

नेहरू युवा केंद्राच्या वतीने मंगरूळपीर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.

Image
  नेहरू युवा केंद्राच्या वतीने मंगरूळपीर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न. -----------------------------------  रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंग ठाकूर  -----------------------------------  "नेहरू युवा मंडळ व राजा प्रसेनजित संस्था केकतउमरा यांच्या आयोजन "  मंगरूळपीर ; नेहरू युवा केंद्र व मेरा युवा भारत केंद्र वाशिम युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने मंगळगिरी ते तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे घेण्यात आल्या.या स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ व राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था केकतउमरा यांच्या वतीने श्री.वसंतराव नाईक व अमरसिंग नाईक वरिष्ठ महाविद्यालय मंगरूळपीर येथे करण्यात आले होते. यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवक युती यांनी मोठा सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदविला होता यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना व सन्मानचिन्ह, मेडल सन्मानपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेमध्ये मुलांकरिता 100 मीटर धावणे,गोळाफेक, कबड्डी मुलींकरिता  100 मीटर धावणे, गोळा फेक आणि खो.खो  स्पर्धेचे घेण्याचा आल...

आज वाईतील ३५० वर्षांची परंपरा असलेला कृष्णाबाईचा उत्सव सुरू झाला.

Image
आज वाईतील ३५० वर्षांची परंपरा असलेला कृष्णाबाईचा उत्सव सुरू झाला.  ----------------------------------  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------  वाईतील ७ घाटांवर माघ शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन शुद्ध द्वादशी पर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचा इतिहास असा की, जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीवेळी वाईतील शेंडे शास्त्री व इतर ब्रह्मवृदांनी आई कृष्णेच्या पत्रात उभं राहून नवस केला की जर आमचा राजा सुखरूप परत आला तर आम्ही तुझा उत्सव सुरू करू' आणि महाराज प्रतापगडावरून सुखरूप परत आल्यावर वाईतील रामडोह आळीच्या घाटावर पहिला उत्सव सुरू झाला. आता तो वाईतील सातही घाटांवर अविरत सुरू आहे. सर्व घाटांवरील उत्सवाचे स्वरूप साधारणतः एकसारखे असते. उत्सवाची सुरुवात छाबिना म्हणजेच पालखीने होते. पालखीवेळी पारंपरिक सातारी धनगरी ढोल वाजवले जातात. यानंतर उत्सव काळात विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम असतात. एक दिवस प्रयोजन म्हणजेच महाप्रसाद असतो आणि यामध्ये आमटीभात, वांग्या बटाट्याची भाजी, मिरचीचा खर्डा आणि एखादा गोड पदार्थ असतो. प्रत्येक घा...

जनता शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड.

Image
जनता शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड. ---------------------------------  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------  वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कार्यकारी मंडळाची व पदाधिकाऱ्यांची पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. विश्वस्त कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने नवीन मंडळाची व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी दि. ३० जानेवारी २०२५ रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून सभेत संस्थेच्या एकूण २९ सदस्यांपैकी २४ सदस्य उपस्थित होते. विश्वस्त कार्यकारी मंडळावर श्री. मदन भोसले, श्री. शंकरराव गाढवे, डॉ. जयवंत चौधरी, प्रा. नारायण चौधरी, श्री. केशवराव जाधव (पाडळे), श्री. सुरेश यादव, श्री. मिलिंद पाटील (जाधव), सीए उदयभाई गुजर, श्री. प्रवीण जगताप, श्री. सुनील शिंदे, व पदसिद्ध सदस्य प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांची निवड झाली. या सभेनंतर पदाधिकारी निवडीसाठी नवीन विश्वस्त कार्यकारी मंडळाची सभा झाली. या सभेत अध्यक्ष - श्री. मदन भोसले, उपाध्यक्ष - श्री. शंकरराव गाढवे, सचिव - डॉ....

पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा

Image
  पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा. --------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ---------------------------------- एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांचे आवाहन. *कोल्हापूर, दि. २८ जानेवारी २०२५-* प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरीता राष्ट्रीयकृत बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी आज (दि. 2८) कोल्हापूर परिमंडल कार्यालयातील घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते.  कोल्हापूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’, प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना व इतर प्रमुख कामांचा आढावा घेण्यासाठी नीता केळकर यांनी कोल्हापूर येथे बैठक घेतली. तत्पूर्वी ग्राहक संघटना व उद्योजकांच्या समस्याही जाणून घेतल्या व त्यावर अंमल...

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

Image
  दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. --------------------------  रिसोड  प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर  --------------------------   दैनिक युवक आधारच्या पहिल्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज पूजन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खांदेश्वर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  स्मिता ढाकणे मॅडम पनवेल वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक  संजय पाटील प्ररणिता फाउंडेशनच्या संस्थापिका   साक्षी  सागवेकर  दिशा महिला मंचच्या संस्थापिका नीलम दाते आंधळे  महिला बचत गटाच्या प्रमुख .स्वप्ना साखरे डॉ. शुभदा निल  सामाजिक कार्यकर्ते  बबन बारगजे   तसेच दैनिक युवक आधारच्या मुख्य संपादिका भारती संतोष आमले  याच्या हस्ते करण्यात आला. मागील एक वर्षापासून    वृत्तपत्राच्या  स्पर्धेत दैनिक युवक आधारची घोडदोड सुरू केली होती  दैनिक युवक आधार  अति कमी वेळामध...

रिसोड येथे अंगणवाडीचा आरंभ पालक मेळावा.

Image
  रिसोड येथे अंगणवाडीचा आरंभ पालक मेळावा.  ------------------------------  रिसोड प्रतिनिधी रणजीत सिंह ठाकुर  ------------------------------  रिसोड: रिसोड शहरात बालविकास नागरी प्रकल्प अकोला वाशिम अंतर्गत शहरातील पंधरा अंगणवाडी मिळुन सावित्रीबाई फुले विद्यालय येथे आरंभ पालक मेळावा घेण्यात आला .या मेळाव्याचा उद्देश हाच कि पालकांना बालसंगोपनाच्या विविध घटकाबदल माहिती देणे पालकांना बालविकासाविषयी करण्यासाठी सोदाहरण माहिती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मोरे, प्रमुख असद खान सर मुख्याध्यापक, शालिग्राम पठाडे सर, प्रमुख मार्गदर्शिका मुख्य सेविका शुभांगी शिंदे मॅडम होत्या. प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमानां पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मेळाव्यात पंधरा अंगणवाडीचे पंधरा स्टाॅल लावले होते. त्या स्टाॅल मधुन विविध प्रकारची बालसंगोपन विषयी माहिती अंगणवाडी सेविका देत होती.जसे कि भविष्याचे ...

अंतराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार डॉ. गिरीश जाखोटीया यांचा आज इचलकरंजीत टॉक शो.

Image
  अंतराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार डॉ. गिरीश जाखोटीया यांचा आज इचलकरंजीत टॉक शो. -------------------------------- कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे  -------------------------------- कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी  सभा, श्री महेश सेवा समिती इचलकरंजी  ,कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महेश भवन इचलकरंजी येथे बुधवार, 29 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. गिरीशजी जाखोटिया यांचे ‘कृष्णनिती इन बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयावर टॉक शोचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. जाखोटीया यांनी लिहिलेली पुस्तके कॉर्पोरेट जगत आणि विद्यापीठांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेषतः तरुण उद्योजकांसाठी या टॉक शोचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 ते 11.30 यावेळेत हा टॉक शो होणार आहे. डॉ. जाखोटीया यांनी ओमान सरकार, सीआयएमए लंडन, ईटीए  एस्कॉन ग्रुप, दुबई इत्यादींनाही सेवा दिल्या आहेत. ते टाटा ग्रुप, महिंद्रा ग्रुप, जेके ग्रुप, ब्रिटिश पेट्रोलियम, सीमेन्स, गोदरेज ग्रुप, लार्सन अँड टुब्रो, स्वराज, एच...

नियोजन आणि जवाबदारीपूर्वक प्रयत्न हेच यशाचे खरे सूत्र - जिल्हा पोलिस अधीक्षक - अनुज तारे.

Image
  नियोजन आणि जवाबदारीपूर्वक प्रयत्न हेच यशाचे खरे सूत्र - जिल्हा पोलिस अधीक्षक - अनुज तारे. -----------------------------------  रिसोड प्रतिनिधी रणजीत सिंह ठाकुर ----------------------------------- वाशिम : दि. 28, स्थानिक श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय आणि श्री. शिवाजी अध्यापक विद्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील यश हे वर्तमानातील तयारीवर अवलंबून असते, त्यामुळे व्यक्तीने नियोजन करून जवाबदारीपूर्वक केलेले प्रयत्न कोणत्याच क्षेत्रात अपयश येऊ देत नाही. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे यांनी केले. यावेळी स्वागत गीताने श्रद्धा मुसळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य दिशा देणे हा होता. प्रमुख अतिथी श्री. अनुज तारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ‘करियर म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा’ नसून करियर या विषयाची व्यापकता त्यांनी स्पष्ट केली. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या मार्...

वाई: दि. विद्यार्थ्यांनी फुलासारखे पंख पसरून ज्ञानाचा आनंद घेत जीवन विकसित करावे.

Image
वाई: दि. विद्यार्थ्यांनी फुलासारखे पंख पसरून ज्ञानाचा आनंद घेत जीवन विकसित करावे. ----------------------------------  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------   पुस्तकांबरोबरच निसर्गाचे आणि माणसांचेही वाचन करण्याचे कौशल्य अंगीकारले पाहिजे. स्वतःबरोबरच समाजाचीही उन्नती होईल अशी उंच स्वप्ने उराशी बाळगून जीवनाची वाटचाल केली पाहिजे, असे उद्गार प्रसिद्ध मराठी लेखिका शेतीतज्ज्ञ व समाजसेविका श्रीमती रेणू दांडेकर यांनी काढले.  येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, उपप्राचार्य श्री बाळासाहेब कोकरे पर्यवेक्षक व कार्याध्यक्ष श्री अर्जुन जाधव, क्रीडा शिक्षक श्री सचिन चव्हाण, श्री मदन जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते.  श्रीमती रेणू दांडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी विपूल वाचन केल्याशिवाय त्यांचे विचार...

मुरगूडच्या " श्री आत्मरूप गणेश " मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Image
  मुरगूडच्या " श्री आत्मरूप गणेश " मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन. ---------------------------------- मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार ----------------------------------- मुरगूड येथिल नवमहाराष्ट्र मंडळ प्रणित भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व गणेश जयंतीनिमित्य व  " श्रीआत्मरूप गणेश मंदिराच्या २९ व्या वर्धापनदिनानित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . शुक्रवार दि .३१ / १ / २०२५ रोजी वैभव लक्ष्मी कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे . यावेळी प्रत्येक रक्तदात्यानां नवमहाराष्ट्र मंडळामार्फत गिप्ट देण्यात येणार आहेत . शनिवार दि .१ / २ / २०२५ रोजी सकाळी ८वाजता तुरंबे ता . राधानगरी येथिल ज्ञानोबा तुकोबा अध्यात्मिक वारकरी लहान मुलांची शैक्षणिक संस्थाची दिंडी सोहळा व ह . भ .प. युवा किर्तनकार ओंकार महाराज सूर्यवंशी यांचा या दिंडीत सहभाग असणार आहे . या सोहळ्यानंतर दुपारी १२ वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे . तसेच रात्री ९ वाजता मुरगूड येथिल संत बाळूमामा मंडळाचे भजन होणार आहे . रविवार दि .२ / २ / २०२५ रोजी सकाळी ७ वाजून ३० मि...

मुरगूडच्या मुलींना महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीत पाच सुवर्ण पदके.

Image
मुरगूडच्या मुलींना महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीत  पाच सुवर्ण पदके. ---------------------------------- मुरगूड  प्रतिनिधी  जोतीराम कुंमार ----------------------------------       देवळी ,जिल्हा वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती (SAI)संकुल च्या मुलींनी पाच सुवर्ण,एक रौप्य व तीन कास्य पदकांची कमाई केली.     सुवर्ण पदके याप्रमाणे. नंदिनी बाजीराव साळोखे (50 किलो.),स्वाती संजय शिंदे (53 किलो), तन्वी गुंडेश मगदूम (57 किलो.),शिवानी बिरु मेटकर (68 किलो.),वैष्णवी रामा कुशाप्पा (72 किलो.)  रौप्य पदके , गौरी अमोल पाटील (59 किलो.) कास्य पदके  ,.नेहा किरण चौगुले (55,स्नेहल शिवाजी पालवे (59किलो.),अस्मिता शिवाजी पाटील.(62 किलो.)    अमृता शशीकांत पुजारी हिने ओपन (76 किलो) मध्ये उप महाराष्ट्र केसरी हा किताब मिळविला. त्यांना मार्गदर्शन एनआयएस आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे ,माजी नगराध्यक्ष  सुखदेव येरुडकर ,दयानंद खतकर ,सागर देसाई तर माजी खासदार.संजयदादा मंडलिक,कार्...

76 हजार रुपये डिझेल चोरी प्रकरणी राधानगरीचा गौरव मोरस्कर यांच्या गुन्हा दाखल.

Image
  76 हजार रुपये डिझेल चोरी प्रकरणी राधानगरीचा गौरव मोरस्कर यांच्या गुन्हा दाखल. ------------------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------  राधानगरी तालुक्यातील जिओ कंपनीचे टॉवर बसवले आहे त्यासाठी लागणारे डिझेल कंपनीचा टेक्नोशीयन राधानगरीचा  गौरव मोरस्कर याने 76 हजार रुपये किमतीचे डिझेल चोरून विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली राधानगरी तालुक्यामध्ये  तळगाव ठीकपुर्ली भोसलेवाडी कौलव डवरवाडी असडोली पडसाळी आनाजे दुर्गमांनवड सोळाकुर राशिवडे या 11 ठिकाणी जिओ कंपनीने टॉवर उभा केल्या असून त्यासाठी जिओ कंपनीने राधानगरी येथील टेक्नोसीयन गौरव मोरस्कर नियुक्ती केली आहे त्याने वरील ठिकाणी जनरेटरला लागणारे डिझेल कंपनी मार्फत पुरवठा केला जातो टेक्नोसीयन गौरव मोरस्कर यांनी दिनांक 12 जानेवारी 25 ते 23 जानेवारी 25 या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये गौरव मोरस्कर 832 लिटर डिझेल याने परस्पर विक्री करून 76 हजार रुपये कमवले आहेत त्यामुळे कंपनीचे नुकसान ...

आ. चिखलीकर यांनी घेतला लोहा - कंधार मधील विविध विकास कामांचा आढावा : प्रलंबित कामे नियोजित वेळी पूर्ण करण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना.

Image
  आ. चिखलीकर यांनी घेतला लोहा - कंधार मधील विविध विकास कामांचा आढावा :  प्रलंबित कामे नियोजित वेळी पूर्ण करण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना. --------------------------- लोहा प्रतिनिधी अंबादास पवार  --------------------------- लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय योजनांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करा . लाभार्थ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियोजन करा अशा सूचना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत . नांदेड येथील जिल्हा नियजन भवनात  आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. चिखलीकर हे होते . यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुखही बैठकीला उपस्थित होते. कंधार आणि लोहा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेऊन गऊळ येथील लाल कंधारी संशोधन केंद्राचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला . याच बैठकीत जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा आढावा आ. चिखलीकर यांनी घेतला.  या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती...

आरंभिक शिक्षणाच्या संवर्धनास बळकटी देणार…. डॉ. मीना शेंडकर.

Image
आरंभिक शिक्षणाच्या संवर्धनास बळकटी देणार…. डॉ. मीना शेंडकर. -------------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  -------------------------------------- शिक्षण विभाग कोल्हापूर मार्फत मिशन अंकुर कार्यशाळा संपन्न. नवीन शैक्षणिक धोरण - २०२० नुसार इयत्ता ३ री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस मूलभूत वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास सर्वोच्य प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट सन २०२६/२७ पर्यंत साध्यकरण्याच्या निर्धाराने भारत सरकारने निपुण भारत अभियानाची सुरूवात केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्यामध्ये हे अभियान प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टीने मिशन अंकुर-आरंभिक साक्षरता संवर्धनाचा कार्यक्रम' हा नवोपक्रम राबविणे येत आहे. या नवोपक्रमाचे वैशिष्ठ्ये म्हणजे या परीक्षेव्दारे मुलांच्या आरंभिक साक्षरतेचे मुल्यमापन होईलच, पण वर्गाच्या रॅकींग पध्दतीमुळे शिक्षकांच्या अध्यापनाचे ही मुल्यमापन होणार आहे. या संपूर्ण नवोपक्रमाची कार्यवाही खालील प्रमाणे होईल. • नवीन शैक्षणिक धोरणानुसार व निपुण भारत अभियानांतर्गत १००% विद्यार्थ्यांचे पायाभू...

टाकवडे येथील 'आनंदी स्वीट्स अँड नमकीन' कंपनीला लागली आग पाऊण कोटीचे नुकसान सुदैवाने जिवितहानी नाही.

Image
  टाकवडे येथील  'आनंदी स्वीट्स अँड नमकीन' कंपनीला लागली आग पाऊण कोटीचे नुकसान सुदैवाने जिवितहानी नाही. -------------------------  कोल्हापूर प्रतिनिधी शशिकांत कुंभार  -------------------------   सोमवार, दिनांक 27 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आनंदी स्वीट्स अँड नमकीन या कंपनीला भीषण आग लागली.आगीची माहिती मिळताच इचलकरंजी, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कंपनीतील नमकीन, कुरकुरे, स्वीट साहित्य, मशिनरी, गॅस टाक्या आणि इमारत संपूर्णपणे जळून खाक झाल्या . प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत कंपनीला सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे अभिजित कांबळे आणि श्री पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली.तसेच घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून पंचनामा झाल्यानंतर किती नुकसान झाले हे कळेल  रात्रीची वेळ असल्यामुळे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र,कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने मालक व कर्मचारी,ग्रामस्थातुन हळहळ व्य...

अमरावती येथील जेष्ठ पत्रकार पी एन देशमुख.व गजाननराव जिरापुरे यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित.

Image
  अमरावती येथील जेष्ठ पत्रकार पी एन देशमुख.व गजाननराव जिरापुरे यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित. ------------------------------- अमरावती प्रतिनिधी पी एन देशमुख ------------------------------- अमरावती येथील ज्येष्ठ पत्रकार पुडलिकराव नागोराव देशमुख (पी.एन.देशमुख)  अमरावती तथागत टीव्ही चॅनलचे ब्युरोचिफ व दै सुपरभारत चे अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी हे निर्भीडपणे तळागळातील सामान्य जनतेचे प्रश्न शासना पर्यंत लिखाण करुन वाचा फोडणारे पत्रकार तसेच दैनिक सुपरभारत चे अमरावती जिल्हा प्रतिनिधी.गजानन जीरापुरे अमरावती तथागत टी.टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी यांना २६जाने.२02५ रोजी उत्कृष्ट पत्रकार यांचे  .तथागत  टीव्ही चॅनल चे संस्थापक अरुण भाऊ वानखडे यांच्या हस्ते अमरावती येथे पत्रकार सन्माननीय श्री पी एन देशमुख व जिरापुरे यांना, गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

"मिले सुर मेरा, तुम्हारा ss तो, सूर बने हमारा ssss गोल्डन ज्युबली मित्रांचा स्नेहोत्सव एक आणि दोन फेब्रुवारीला !

Image
"मिले सुर मेरा, तुम्हारा ss तो, सूर बने हमारा ssss गोल्डन ज्युबली मित्रांचा स्नेहोत्सव एक आणि दोन फेब्रुवारीला ! *,पेटाळा हायस्कूल तथा स.म.लोहीया हायस्कूल- कोल्हापूरचे सन १९७५ चे स्नेही वयाच्या ६५ वर्षानंतर भेटणार ! अनुभव -गप्पा- मनोरंजन च्या विश्वात रमणार . मदन कदम | कुमार नाडकर्णी -- आयुष्याच्या ह्या वळणावर, मित्रांनी सहकुटुंब येणे हीच कल्पना सर्वांसाठी ऊर्जा देणारी आहे. कोल्हापूरच्या त्या वेळच्या पेटाळा हायस्कूल आणि आत्ताच स.म.लोहीया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि आज वयाची पासष्टी पूर्ण केलेल्या मित्रांनी एकत्र येत, "शाळा सोबती १९७५" हा ग्रुप तयार केला. मित्रांना एकत्र आणण्यात कोल्हापूरचा शेखर माने आणि तेथील सहकाऱ्यांनी कमांडर ची भूमिका बजावली.अन् स्नेहोत्सव साजरा करण्याची संकल्पना सर्वांनी अमलात आणली. यामध्ये डॉक्टर शिरीष कुलकर्णी, रमेश बक्षी,सुधीर महामुनी, मदन कदम ,राजेंद्र खराडे, अशोक राऊत , चं.गो.कुलकर्णी, दिलीप आमटे, एन.एम कुलकर्णी,सुनील मोटे,सुरेश निकम ,शशांक कशाळीकर, सीजी कुलकर्णी, मुरारी- सांगवेकर- मिलिंद देशपांडे- नितीन शुक्ला- जीएम लांजेकर, मुकुंद सोहनी,...

निधन वार्ता.

Image
  निधन वार्ता. नागाव : महादेव शंकर पोवार वय (७५) यांचे निधन झाले  त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे  रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ९ वाजता नागाव येथे आहे

वीज ग्राहकांसाठी आज(दि.२८) सौर ऊर्जा जनजागृती मेळावा.

Image
वीज ग्राहकांसाठी आज(दि.२८) सौर ऊर्जा जनजागृती मेळावा. ------------------------------ कोल्हापूर प्रतिनिधी ------------------------------ मेळाव्याचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन. *, दि. २७ जानेवारी २०२५ :* केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून प्रधानमंत्री सूर्य घर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजना राबवण्यात येत आहेत. या अनुषंगाने वीज ग्राहकांकडून सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महावितरण व सोलर बीएनआय या सामाजिक संस्थेकडून संपूर्ण राज्यात जनजागृतीचा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जनजागृतीचा हा मेळावा आज (दि.२८ जानेवारी) रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत हॉटेल अयोध्या, ताराराणी चौक (कावळा नाका) कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सौर ऊर्जेच्या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करणे व शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेद्वारे केंद्र सरकार छतावर सौर प्रणाली बसवणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते. मेळाव्यातून या योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया, श...

शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोपशहर प्रमुखपदी अनुराधा पाटील यांची निवड.

Image
शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोपशहर प्रमुखपदी अनुराधा पाटील यांची निवड. -------------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे  --------------------------------- :टोप ग्रामपंचायत सदस्याअनुराधा प्रकाश पाटील यांची शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोप शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली. खा. धैर्यशील माने यांच्या हस्ते व महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली ङोंगरे, प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. पाटील यांची सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली .

प्रधानमंत्री घरकुल योजनेचा पायाभरणी शुभारंभ सांगवडे येथे संपन्न झाला.

Image
  प्रधानमंत्री घरकुल योजनेचा पायाभरणी शुभारंभ सांगवडे येथे संपन्न झाला. -----------------------------  हुपरी  प्रतिनिधी  जितेंद्र जाधव ------------------------------  आज 26 जानेवारी रोजी सांगवडे येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेचा पायाभूत शुभारंभ संपन्न झाला श्रीमती ताराबाई हरिश्चंद्र निकम यांना प्रधानमंत्री योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे या घरकुल योजनेचा शुभारंभ सौ.अश्विनी केरलेकर मॅडम एकात्मिक बाल विकास अधिकारी ग्रामीण जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच आर एच इ  पंचायत समिती करवीर कोल्हापूर अनुज रंगसुभे साहेब त्यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला सरपंच सौ रुपाली कुंभार मॅडम   ग्रामविकास अधिकारी सौ. सारिका बंडगर मॅडम ग्रामपंचायत च्या सदस्या सौ ज्योतीp जाधव मॅडम ग्रामपंचायतचे सदस्य शितल भेंडवडे सनी काशींबरे माजी ग्रामपंचायत सदस्य राजू जाधव भाजप मूक मोर्चा उपाध्यक्ष अंकुश चांदणे सदस्य सतीश बिरांजे जितेंद्र जाधव विजय जाधव वैभव सनदी अर्जुन जाधव ग्रामपंचायत लिपिक अरुण सोनवणे कर्मचारी राजू बगाडे सुकुमार जाधव  विशेष कार्यकारी अधिकारी शंभू गुरव  सामा...

पेडगाव सोनोने कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम.जुन्या प्रथा-परंपरांना फाटा देत शिक्षणासाठी पैसा खर्च करणार.

Image
  पेडगाव सोनोने कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम.जुन्या प्रथा-परंपरांना फाटा देत शिक्षणासाठी पैसा खर्च करणार. --------------------------------------- रिसोड प्रतिनिधी.  रणजीत सिंह ठाकुर --------------------------------------- “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आपल्या आयुष्यात उतरवून स्वत:च्या कुटुंबाला आणि समाजाला पुढे घेवून जाणाऱ्या पेडगावच्या सोनोने कुटुंबाने अजून एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. सोनोने कुटुंबाच्या वतीने दरवर्षी २६ जानेवारीला जिल्हा परिषद शाळा पेडगांव येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाची आवड लागावी तसेच थोरा-मोठ्यांमध्ये देखील वाचनसंस्कृती वाढीस लागावी म्हणून ‘एकलव्य’ सार्वजनिक वाचनालय कोणत्याही शासकीय मदतीशिवाय चालवले जाते. विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी जोमाने अभ्यास करावा या उद्देश्याने सोनोने कुटुंबाकडून असे उपक्रम राबवविले जातात. याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून यावर्षी स्व.प्रल्हाद सोनोने...

निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Image
  निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ---------------------------------  रिसोड प्रतिनिधी रणजीत सिंह ठाकुर. ---------------------------------  2024 मध्ये संपन्न झालेल्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुनेश्वरी एस. व रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर त्यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वाशिम येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निवडणूक निकालापर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणुका शांततेत पार पडल्या.यादरम्यान मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गावागावात विविध पथकाद्व...

किसन वीर महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टचे उद्धघाटन सोहळा उत्साहात संपन्न.

Image
  किसन वीर महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टचे उद्धघाटन सोहळा उत्साहात संपन्न. ---------------------------------- वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------  वाई : दि. २६/०१/२०२५ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या इनडोअर स्पोर्टस् हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन बॅडमिंटन कोर्टचे उद्धघाटन सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले उपस्थित होते. उद्धघाटन सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले म्हणाल्या की,"किसन वीर महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ३ बॅडमिंटन कोर्ट तयार करून; मा. मदनदादांनी ग्रामीण भागातील बॅडमिंटन खेळाडूंना राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची एक नामी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा लाभ या भागातील विद्यार्थी खेळाडू घेतीलच याची खात्री मला आहे. यासाठी सातारा जिल्हा बॅडमिंटन असोशिएशन आपणाल...

नेताजी सुभाषचंद्र बोस थोर क्रांतीकारक नेते होते : - डॉ.सोपान शेंडे.

Image
नेताजी सुभाषचंद्र बोस थोर क्रांतीकारक नेते होते : - डॉ.सोपान शेंडे. ----------------------------------  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------  वाई: ‘आझाद हिंद सेना’ स्थापन करून सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिले आहे, त्यांच्या जयंतीदिनी सर्व भारतीयांनी स्मरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ.सोपान शेंडे यांनी केले.जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत इतिहास,राज्यशास्त्र विभाग,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे होते. या प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे,अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. भिमराव पटकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या व्याख्य...

एसटी भाडेवाढ विरोधात हातकलंगले येथे उद्या चक्का जाम आंदोलन-उबाठा जिल्हाप्रमुख संजय चौगुले.

Image
  एसटी भाडेवाढ विरोधात हातकलंगले येथे उद्या  चक्का जाम आंदोलन-उबाठा जिल्हाप्रमुख संजय चौगुले. ------------------------- कुंभोज प्रतिनिधी   विनोद शिंगे --------------------------- शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उध्दवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने व  आदरणीय संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली "महाराष्ट्र शासनाने केलेल्या एसटी भाडेवाढी विरोधात" चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सदर आंदोलनास महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान संजय  चौगुले शिवसेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर यांनी केले आहे.         मंगळवार सकाळी १०.०० वाजताहातकणंगले बसस्थानक, सांगली कोल्हापूर रोड हातकणंगले येथे होणार आहे.

कोल्हापूर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकाने सन्मानित.

Image
  कोल्हापूर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकाने सन्मानित. ------------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार. ------------------------------------- कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  सुनील फुलारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या  पूर्वसंध्येला वैशिष्ट्य पुर्ण सेवा केल्याबद्दल दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे  यापुर्वी सुनील साहेब यांना सन 2013 ला गुणवत्ता पूर्ण सेवा केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले होते त्याच्या कारकिर्दीचा अल्पसा परिचय  १. गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. २. नागपूर शहरात मोका व एमपीडीए कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करून गंभीर गुन्हयांमधील घट घडवून उत्कृष्ट कामगिरी केली. ३. सन २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारी दरम्यान कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली. ४. कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड येथील जातीय संघर्ष / हिंसाचार, मराठा आरक्षणविषयक आंदोलने यादरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती उद्भव...

वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष.

Image
  वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष. -------------------------  पन्हाळा प्रतिनिधी   आशिष पाटील  ------------------------- सर्वसामान्य गोर गरीब जनतेच्या प्रत्येक अडी-अडचणीत त्यांच्या मदतीला धावून येणारे, खरं तर एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह हे वाक्य ज्यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे लाडके नेते कसबा ठाणे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच, कुंभी कासारी साखर कारखाना संचालक मा. श्री. अनिष जयसिंगराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*