Posts

Showing posts from March, 2025

जिल्हा परिषदेमार्फत मराठी शाळेच्या उपक्रमास सुरुवात गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा.

Image
  जिल्हा परिषदेमार्फत मराठी शाळेच्या उपक्रमास सुरुवात गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा. --------------------------------------  हुपरी प्रतिनिधी   जितेंद्र जाधव -------------------------------------  चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात त्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक असा पवित्र समजला जातो या आध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करून घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा या उद्देशानेच गुढीपाडवा शाळेत प्रवेश वाढवा हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो या गुढीपाडव्याच्या दिवशी 6 वर्षे पूर्ण असणाऱ्या आपल्या बालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश निश्चित करून आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याचा शुभारंभ करावा असे आव्हान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केले आहे   जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये शंभर टक्के पट नोंदणी नियमित उपस्थिती आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके दुपारचे जेवण श...

व्हाँईस आँफ मीडीया खंडाळा तालूका कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित.

Image
 व्हाँईस आँफ मीडीया खंडाळा तालूका कार्यकारणी पदाधिकारी  यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित.   ---------------------------                जावली  प्रतिनिधी शेखर जाधव  ---------------------------  सातारा/ :- खंडाळा  व्हाँईस आँफ मीडीया पत्रकारांच्या न्यय हक्कां साठी लढणारी बावन्न देशात कार्यरत असणारी भारतातील एक नंबरला असणारी ऐकमेव संघटना म्हणजे व्हाँईस आँफ मीडीया याच संघटनेची मुहूर्त मेड रोवली काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीपजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिनजी मोहिते साहेब  यांच्या  मार्गदर्शनाने . सातारा जिल्हा अध्यक्ष श्री अनिल करंदकर(पाटील) आणि सातारा जिल्हा कार्यकाणी पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज नविन वर्षाच्या मुहूर्तावर खंडाळा तालुका कार्यकारणी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी  आणि नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन शासकीय खंडाळा गेस्टहाऊस या ठिकाणी करण्यात आले य...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद *

Image
  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद * -------------------------------------------------- शशिकांत कुंभार  -------------------------------------------------- चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरूवात करणेसाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा या उद्देशाने 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी राबविला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत गुढी पाडव्यादिवशी दाखलपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक यांना अगत्यपूर्वक शाळेत आमंत्रित करावे, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत करावे तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरुन त्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करणेबाबत कळविणेत आले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' या उ...

लक्ष्मीपुरीतील दत्त ट्रेडर्स या दुकानदाराकडून सातशे किलो प्लास्टिक जप्त .

Image
 लक्ष्मीपुरीतील दत्त ट्रेडर्स या दुकानदाराकडून सातशे किलो प्लास्टिक जप्त . कोल्हापूर ता.29 : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्ष्मीपूरी येथे हि मोहीम राबविण्यात आली. दुपारी या मोहिमेअंतर्गत सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी पथकांमार्फत लक्ष्मीपूरी परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी केली. यावेळी लक्ष्मीपूरी येथील दत्त ट्रेडर्स दुकानदाराकडे 700 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक आढळून आले. सदरचे प्लॅस्टीक जप्त करण्यात आले असून बाजूचे इतर प्लास्टिक विक्रेते दुकानदार पळून गेल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करता आली नाही. पण 8 ते 10 दिवसात शंभर टक्के कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार, सहाय्यक आरोग्य निरीक्षक नंदकुमार कांबळे, मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली.

एम.जी.शहा विद्यामंदिर बाहुबली येथे गुढीपाडव्यानिमित्त शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.

Image
 एम.जी.शहा विद्यामंदिर बाहुबली येथे गुढीपाडव्यानिमित्त शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न. ------------------------------------------------------ कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) ------------------------------------------------------ बाहुबली  एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली येथे गुढीपाडव्यानिमित्त नूतन विद्यार्थी  प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारातून सवाद्य मिरवणूकीने आणण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे  यांनी केले. शाळेमध्ये असणारे विविध उपक्रम यांची माहिती त्यांनी दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी आपल्या मनोगतामधून नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करणे, ही आपल्या संस्थेसाठी एक मोठी आनंदाची बाब आहे. हे विद्यार्थी आपल्या संस्थेची परंपरा पुढे नेतील आणि संस्थेच्या विकासात मोलाचे योगदान देतील, याची मला खात्री आहे. जवळपास इ.५ वी ते ११ वीचे एकूण सुमारे २०० विद्यार्थ्यांनी आज आपला प्रवेश निश्चित केला.         या कार्यक्रमासाठी प्रशालेचे  पर्य...

राजधानी ढाबा वनोजा येथे विनापरवाना अवैध दारू डिझेल विक्री

Image
  राजधानी ढाबा वनोजा येथे विनापरवाना अवैध दारू डिझेल विक्री . ------------------------------------------------  मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  ---------------------------------------------- कोरपना तालुकातील वनोजा  महामार्ग  रस्त्या वरील राजधानी ढाबा, वर विनापरवाना अवैध दारू डिझेल  विक्री सुरू आहे.धाबा मालक म्हणतात की माझा कडे डिझेल विक्री चा परवाना आहे असे सांगून  रात्रौ ला व पाहाटे अवैध डिझेल विक्री सुरू आहे   याची चौकशी करून राजधानी ढाबा मालक वर कारवाई करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे

निपाणी देवगड रोडवरील फेजीवडे गावच्या हद्दीतील दोन झाडे गायब ग्रामस्थांनी केली चौकशीची मागणी .

Image
 निपाणी देवगड रोडवरील फेजीवडे गावच्या हद्दीतील दोन झाडे गायब  ग्रामस्थांनी केली चौकशीची मागणी . ---------------------------------------------- राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे. --------------------------------------------- निपाणी देवगड रस्त्यावर असणाऱ्या फेजिवडे मेन रस्त्यावरील अज्ञात व्यक्तीने दोन झाडे चोरून नेले असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ कडून होत आहे या बाबत अधिक माहिती अशी की निपाणी देवगड मुख्य रस्त्यावर असणाऱ्या  फेजीवडे येथून धरणाकडे जाणारा मेन रोडवरील  दोन झाडे अज्ञात व्यक्तींनी होळी दिवशी चोरून नेले असल्याचे समजते पण त्या रोडवरून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी येजा करीत असतात व वन्यजीव व प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी कर्मचारी चोरी झालेल्या  झाडा जवळून जात असतात पण त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते व वनजीव खात्याचे अधिकारी व प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष का करत आहेत व ज्या अज्ञात व्यक्तींनी झाडे तोडून  नेली आहेत त्याची चौकशी करण्यात यावी व या झाडे चोरी मध्ये वनजीव व सार्वजनिक बांधकाम खाते प्रादेशिक वन वि...

रखरखत्या उन्हात निराधार धडकले तहसील कचेरीवर

Image
 रखरखत्या उन्हात निराधार धडकले तहसील कचेरीवर ------------------------------------------------  *मंगेश तिखट* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  ------------------------------------------------- कोरपना - तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने नेतृत्वाखाली कोरपना तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.             अनेक गरजू निराधारांना अद्यापही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नाही. शासनाने योजना सुरू केली असली तरी अंमलबजावणीत अनेक अडथळे येत आहेत. पात्र लाभार्थ्यांना तातडीने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा.नव्याने अर्ज करणाऱ्या गरजू व्यक्तींना वेळीच मंजुरी द्यावी. कोरपना तालुक्यातील लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांचा लाभ निश्चित करावा. दूरच्या अंतरावरील गावात विशेष कॅम्पचे आयोजन करावे ...

माणिकगड सिमेंट कंपनीच्या हापर बंद पाडले आदिवासींचा एल्गार

Image
 माणिकगड सिमेंट कंपनीच्या हापर बंद पाडले आदिवासींचा एल्गार    . ------------------------------------------------- *मंगेश तिखट*  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  ------------------------------------------------  चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या कुसुंबी बॉम्बेझरी चुनखडी उत्खनन माइंस मध्ये गेल्या चार महिन्यापासून जमिनीच्या ताबा मिळविण्यासाठी कोलाम जमातीच्या भीमा पग्गु मडावी व चुन्नू मुक्का आत्राम हे उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या कार्यालयात पायपिट करून त्रस्त झाले आहे तर या कुसुंबी येथील 18 आदिवासी जमिनीचा मोबदला मिळावा व बाधित कुटुंबांना बळजबरीने बडकवलेल्या शेतकऱ्यांच्याजमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी गेल्या चार महिन्यापासून कंपनीच्या माईन्स क्षेत्रामध्येकुटुंबासह या आंदोलन करीत ठाण मांडून बसलेले आहेत मात्र निगरगट्ट महसूल विभागाला याबाबत थोडीही सहानुभूती दाखवलेली नाही यामुळे अखेर आदिवासी चीड निर्माण होऊन कंपनीच्या हापर मध्ये जाऊन कंपनीचे काम बंद पाडले व यावेळी महसूल विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात आला आदिवासीहक्काच्या जमिनी कंपनीने बडकावूनत्या...

दिव्यांग बांधवांच्या शिबीरास उपस्थिती.*

Image
 दिव्यांग बांधवांच्या शिबीरास उपस्थिती.* *📍म. ज्योतिबा फुले विद्यालय, राजुरा* -----------------------------------------------  *मंगेश तिखट* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  ----------------------------------------------- जिल्हा समाजकल्याण विभाग चंद्रपूर तथा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अल्मिको) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आणि सेंट्रल माईन प्लानिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लि.मि. यांच्या निगमीत सामाजिक दायित्व योजनेंतर्गत राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे दिव्यांगाना लागणाऱ्या साहित्यांचे मोफत वाटप करावयासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले; यास आवर्जून उपस्थित राहून शिबीराचे उद्घाटन केले. दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड क्षमता असते. त्यांच्यामध्ये जिद्द असते, काहीतरी करून दाखवण्याची तीव्र इच्छा असते. त्यांना फक्त आपल्या मदतीच्या एका हाताची गरज असते. आज आपण त्यांना तो हात देत आहोत. मला विश्वास आहे की, या साहित्याच्या आणि उपकरणांच्या मदतीने हे बांधव अधिक आत्मविश्वासाने आणि सक्षमतेने आपले जीवन जगतील आणि समाजात आपले महत्त्वपूर्ण योगदान देतील. असा आशावाद व्यक्त करत दिव्य...

धान्याच्या अफरातफरीनंतर 61 रेशन दुकानाच्या केलेल्या तपासणीत आढळले गंभीर दोष.‌‍

Image
  धान्याच्या अफरातफरीनंतर 61 रेशन दुकानाच्या केलेल्या तपासणीत आढळले गंभीर दोष.‌‍ ----------------------------------- फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र अमरावती जिल्हा प्रतिनिधी  पी.एन.देशमुख. . --------------------------------------  अमरावती.अमरावती स्वस्त धान्य दुकानात असून नागरिकांना वितरित केले जाणाऱ्या धान्याची अफरातफर केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तब्बल वीस दुकानाचे लायसन्स रद्द केले आहे मार्च ते डिसेंबर २०२४ या दरम्यानची ही कारवाई आहे लायसन्स रद्द केल्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित सर्व ग्राहकांना नजीकच्या एका दुकानाशी जोडण्यात आले आहे वेगवेगळ्या भागातून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने गेल्या 10 महिन्यात जिल्ह्यातील 61 दुकानाची मोक्यावर जाऊन तपासणी केली या तपासणी दरम्यान 20 दुकानाच्या बाबतीत तक्रार आल्या असून या तपासणी दरम्यान दहा दुकानाच्या बाबतीत गंभीर दोष दिसून आले त्यामुळे त्यांच्या कठोर कारवाई करत लायसन रद्द करण्यात बडगा उगारण्यात आला आहे यामध्ये नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक 3 एप्रिल आणि ऑगस्ट मध्ये प्रत्येकी दोन त...

समाज माध्यमांचा जपून वापर करा ठाणेदार लुले नेर पिंगळी येथे शांतता समितीची बैठक उत्साहात.

Image
  समाज माध्यमांचा जपून वापर करा ठाणेदार लुले नेर पिंगळी येथे शांतता समितीची बैठक उत्साहात. ------------------------------------------- अमरावती जिल्हा प्रतिनिधी  पी एन देशमुख                  . -------------------------------------------   समाज आणि उत्सव हे आनंद एकोपा वाढवण्याचे साधन असले पाहिजेत सर्व धर्मियांनी एकत्र येऊन शांततेने आणी प्रेमाने सण साजरे करावे यामुळे समाजात बंधुत्वाची भावना वाढते कोणत्याही सणाचा आनंद वाद भांडणामुळे गमवू नये असे आवाहन शांतता कमिटीच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी केले.   प्रत्येक धर्माच्या सणांना महत्त्व द्या आणि त्या उत्सवाचे अवचित समजून घेण्याचा प्रयत्न सर्व नागरिकांनी करणे गरजेचे आहे शक्य असल्यास विविध धर्मा उरसामध्ये सहभागी व्हावं  यामुळे परस्परांचे समजून कुठल्याही धर्माचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष कोणाच्या श्रद्धा दुखवणारे वक्तव्य करू नका खोटी किंवा नको माहिती शेअर करू नका कोणतीही धार्मिक पोस्ट शेअ...

लक्ष्मीपूरीतील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडून दोन हजार किलो प्लास्टिक जप्त.

Image
  लक्ष्मीपूरीतील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडून दोन हजार किलो प्लास्टिक जप्त. ----------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी रजनी कुंभार --------------------------------- दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित.  ता.28 : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्ष्मीपूरी येथे हि मोहीम राबविण्यात आली. दुपारी या मोहिमेअंतर्गत सहा.आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांनी पथकांमार्फत लक्ष्मीपूरी परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी केली. यावेळी लक्ष्मीपूरी येथील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडे 2 हजार किलो सिंगल यूज प्लॅस्टिक आढळून आले. सदरचे प्लॅस्टीक जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सदरची कारवाई आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, सुशांत कांबळे, नंदकुमार पाटील, ऋषीकेश सरनाईक, मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली.     ...

शनिवार, रविवार व सोमवार या सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू.

Image
  शनिवार, रविवार व सोमवार या सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू. ------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार -------------------------------  *कोल्हापूर/ सांगली, दि. 28 मार्च २०२५:* मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (दि.29), रविवार (दि.30) व सोमवार (दि.31) रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला वेग देण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी तसेच पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 70 हजार 924 वीज ग्राहकांकडे 24 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 24 हजार 883 वीज ग्राहकांकडे 12 कोटी 95 लाख आणि सांगली जिल्ह्यात 46 हजार 41 वीज ग्राहकांकडे 11 कोटी 25 लाख र...

भविष्यातील 25 वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा.

Image
  भविष्यातील 25 वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा.    -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इचलकरंजी महानगरपालिकेला सूचना. • *विविध विभागांच्या सचिवांशी बैठकीतूनच फोनवर संवाद साधत प्रस्तावांवर जलद कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना*   • *शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार कामे करा* कोल्हापूर, दि.27 (प्रतिनिधी): इचलकरंजी महानगरपालिकेने भविष्यातील 20 ते 25 वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे - शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच महसूल व महानगरपालिकेतील अ...

'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमांतंर्गत बालकांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन.

Image
 ' गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमांतंर्गत बालकांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन. कोल्हापूर, दि. 27 (प्रतिनिधी) : चैत्रशुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा. या उद्देशाने 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो. या अनुषंगाने गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (6 वर्षे पूर्ण असणाऱ्या) बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.          जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 100 टक्के पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृती, स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्श...

नारंडा गावातील स्मशान भूमी चे लोखंडी शेड विक्री केल्याबाबत गावकऱ्यांनी केली तक्रार.

Image
  नारंडा गावातील स्मशान भूमी चे लोखंडी शेड विक्री केल्याबाबत गावकऱ्यांनी केली तक्रार. ---------------------------------------  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  मंगेश तिखट  ---------------------------------------  चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा गाव येथील जुनी स्मशानभूमी होती. त्या स्मशान भूमी बाबत कोणताही निर्णय कोणत्याही वस्तूची विल्हेवाट लावायची असेल तर वरिष्ठ कार्यालय यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याने किंवा निर्लेखन करण्याच्या प्रस्ताव करताना वरिष्ठ कार्यालयास पाठवणे बंधनकारक आहे. परंतु असे न करता ग्रामपंचायत सरपंच व सचिव या दोघांनी संगम मत करून सदर शेड  पूर्ण विकून टाकले अशी तक्रार ना रंडा येथील गावकऱ्यांनी केली आहे   सदर माहिती बाबत सचिव यांना दूरध्वनी द्वारे तक्रार नागरिकांनी संपर्क केला असता मला याबाबत काहीच माहित नाही. नसल्याचे सांगण्यात आले आहे परंतु ग्रामपंचायत चा सचिव या नात्याने याबाबत माहीत असणे आवश्यक होते परंतु संबंधित सचिव यांना माहिती नाही हे खूप खेद जनक बाबत आहे यावरून असे लक्षात येते की ग्रामपंचायत नारंडा येथील सरपंच ह...

कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी.

Image
  कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी. 9 हजार 458 ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित. मार्च अखेर प्रत्येक दिवशी 6 कोटी 92 लाख वसुलीचे आव्हान. *ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – महावितरण* *कोल्हापूर/सांगली, दि. 26 मार्च 2025:* विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 71 हजार 281 ग्राहकांकडे 34 कोटी 59 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. तर गेल्या तीन महिन्यांत परिमंडल अंतर्गत 3 हजार 537 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती 54 हजार 292 ग्राहकांकडे 6 कोटी 67 लाख, व्यावसायिक 6 हजार 406 ग्राहकांकडे 2 कोटी 47 लाख, औद्योगिक 7 हजार 194 ग्राहकांकडे 22 कोटी 19 लाख, सार्वजनिक सेवा 2 हजार 992 ग्रा...

बाळूमामांचा रथ व दुधाच्या घागरींचे निढोरीत जल्लोषी स्वागत.

Image
  बाळूमामांचा रथ व दुधाच्या घागरींचे निढोरीत जल्लोषी स्वागत.      --------------------------       मुरगुड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार --------------------------         महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सद्गुरु बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादासाठी कर्नाटक सीमा भाग व राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे बाळूमामा रथातून विधीपूर्वक आदमापुरकडे नेण्याचा कार्यक्रम आदमापुर पासून २ कि. मी. वर असलेल्या निढोरी ता. कागल येथे धार्मिक व भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषी मिरवणुकीने संपन्न झाला. यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा गजर करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. महाराष्ट्र- कर्नाटकातील १९ बग्गीतून आणलेल्या घागरी निढोरीच्या हनुमान मंदिरात जमा केल्या जातात येथे घागरींचे स्वागत व पूजन केले जाते.          भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर निढोरीतून महाप्र...

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांना संगणक परिचालक नायगाव च्या वतीने निवेदन.

Image
  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांना संगणक परिचालक नायगाव च्या वतीने निवेदन. -------------------------------------- नायगाव तालुका प्रतिनिधी... दिपक गजभारे घुंगराळेकर... -------------------------------------- नायगाव:- दि.23/03/2025 रोजी मा.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा अजितदादा पवार हे नरसी येथील कार्यक्रमासाठी आले असता त्यांना संगणक परिचालक नायगाव तालुक्याच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायत च्या सुधारीत आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणेबाबत बाबत  निवेदन देऊन आपल्या मागणी  संदर्भात चर्चा करण्यात आली. हे निवेदन राज्याध्यक्ष श्री सिद्धेश्वर मुंडे यांच्या आदेशानुसार तसेच लातुर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्यवंशी व नांदेड जिल्हाध्यक्ष संग्राम पा डिकळे व सचिव तुळशीराम बैनवाड मामा यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री यांची भेट घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष दिलिपराव धर्माधिकारी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटनीस मा वसंत पा सुगावे यांच्...

जोतिबाची चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन.

Image
  जोतिबाची चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन. • *प्लास्टिक मुक्त यात्रा साजरी करुन पर्यावरणाचे रक्षण करुया* • *भाविकांनी प्लॅस्टिकच्या पिशवी ऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा* कोल्हापूर दि.25 (प्रतिनिधी): श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे होणारी चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.      श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लॅस्टीक वापरावर बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा, शाहूवाडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, उप अभियंता सुयश पाटील, ग्रामसेवक शिवाजी...

हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती.

Image
  हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पुन्हा बैठक. मुंबई दि.२४ : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही हद्दवाढ झाली नसल्याने कोल्हापूरच्या विकासावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानुसार आज दि.२४ रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन आले होते. या बैठकीत दोन्ही बाजूच्या नागरिकांना विश्वासात घेवून हद्दवाढीबाबत निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.  याबैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव १ अस...

घोडके इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीची उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी -आमदार अशोकराव माने.

Image
 घोडके इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीची उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी -आमदार अशोकराव माने. ------------------------  कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------   कुंभोज तालुका हातकलंगले येथे घोडके इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी चे उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोकरावजी माने ,वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील , यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अशोकरावजी माने म्हणाले की घोडके इलेक्ट्रॉनिक व मोबाईल शॉपी ने मुद्दे व्यवसायात उत्तम उदाहरण घेतली असून त्यांच्या तिसऱ्या शाखेचे कुंभोज येथे उद्घाटन झाले आहे तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे अशी मत मिळाली आमदार अशोकरावजी माने यांनी बोलताना व्यक्त केले.     घोडके इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी चे उद्घाटन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हार्दिक करण्यात आले. यावेळी जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ,महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक अमित साजनकर सरपंच स्मिता चौगुले, उपसर...

कॉफी विथ कलेक्टर या उपक्रमांतर्गत.

Image
  कॉफी विथ कलेक्टर या उपक्रमांतर्गत. --------------------------------- कुंभोज प्रतिनिधी   विनोद शिंगे -------------------------------- आदर्श गुरुकुल विद्यालयातील सर्व स्टाफ ची भेट कलेक्टर अमोल येडगे यांच्याशी    कॉफी विथ कलेक्टर या उपक्रमांतर्गत आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि. कॉलेज,पेठ वडगावचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ.दत्तात्रय घुगरे सर,सचिव तथा मुख्याध्यापिका महानंदा घुगरे मॅडम , पर्यवेक्षक शरद जाधव सर,प्रशासक संतोष पाटील सर  व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत शाळेच्या विविध शैक्षणिक व पर्यावरण पूरक  उपक्रमांची, सुख सुविधांची, खेळांची, वनराईची  माहिती  देणारी सुंदर अशी चित्रफित दाखविण्यात आली. शाळेने राबवलेला सूर्यनमस्कार उपक्रम, शिवचरित्र वाचन उपक्रम, संविधानाच्या अमृत वर्षानिमित्त राबविण्यात आलेला गुरुकुल संविधान वाचन उपक्रम, वेस्ट वॉटर पुनर्वापर उपक्रम, सोलर प्लांट, एक मूल एक झाड दत्तक उपक्रम, मातृ पितृ कृतज्ञता उपक्रम अशा अनेक उपक्रमांचे कौतुक व प्रशंसा जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी ...

कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे शाळेमध्ये नवीन उपक्रम साजरा झाला.

Image
  कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे शाळेमध्ये नवीन उपक्रम साजरा झाला. ---------------------------  हुपरी प्रतिनिधी   जितेंद्र जाधव ---------------------------  कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या शाळेमध्ये एक नवीन उपक्रमाला सुरुवात केली शाळेमध्ये मुलांना पाठ्यपुस्तक सोडून दुसरे काहीतरी गोष्टीची पुस्तके थोर नेत्यांची पुस्तके प्राण्यांची पुस्तके कादंबऱ्या कविता वाचायला उपलब्ध नव्हते काही पालकांनी आपल्या मुलांचा वाढदिवस साध्या पद्धतीने करून वाढदिवसातील बचत झालेले पैसे एकत्र करून आज शाळेमध्ये 40 ते 50 पुस्तकांचे वाटप करण्यात आले   मुलांनी पाठ्यपुस्तकाचा अभ्यास झाल्यानंतर मोबाईल कडे जाऊ नये म्हणून त्यांना काहीतरी जनरल नॉलेज मिळावे म्हणून हा नवीन उपकरण राबवण्यात आला वाढदिवस झाल्यानंतर मुलांना 50 100 चॉकलेट देण्यापेक्षा पालकांनी एक पुस्तक जर दिले तर ते पुस्तक हजारो विद्यार्थी वाचतील त्यामुळे त्यांना नवीन प्रेरणा मिळेल त्यांची बुद्धी प्रज्वलित होईल गावातील काही कार्यकर्त्यांनी या योजनेला आजपासून सुरुवात केली आणि त्यांनी सर्वांना प...

ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन.

Image
  ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. मा. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी २५ वर्षांच्या राज्याच्या वाटचालीच्या अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याची योजना निश्चित केला आहे. त्यांच्या व्हिजनला अनुसरून पहिल्या शंभर दिवसात वीजविषयक सार्वजनिक कंपन्यांसाठी विविध उद्दीष्टे ठरविण्यात आली होती. त्या उद्दीष्टांची माहिती व ती किती पूर्ण झाली याचा लेखाजोखा देणारे ‘हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ हे पुस्तक महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी लिहिले आहे. एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या वेळी पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघना साकोरे बोर्डिकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोक...

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या व महापुरुषाबाबत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर ला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेरबंद .

Image
  इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या व महापुरुषाबाबत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर ला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेरबंद . ------------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  -------------------------------------  कोल्हापूर . इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या व महापुरुषांच्या बाबत बदनामी कारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व जुना राजवाडा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत  दिनांक 24 /03 /2025 रोजी दुपारी 2.45 .वाजता मचरियाल राज्य तेलंगणा या ठिकाणी ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जुना राजवाडा पोलिसांची पथक  कोल्हापूर कडे रवाना झालेले आहे  सदर आरोपी प्रशांत कोरटकर यास कोल्हापूर येथे आणतात त्याला माननीय  न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी दिली सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, जुना राजवाडा पोलीस ठाणेचे प...

गवारेड्याच्या हल्ल्यात दोन जखमी

Image
  गवारेड्याच्या हल्ल्यात दोन जखमी. ------------------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------  राधानगरी तालक्यातील घोटवडे व करवीर तालुक्यातील परिते येथे गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून दोघांना धडक मारल्याने दोघांमधील एकजन गंभीर जखमी झाला आहे.  याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार  परिते ता.करवीर येथील पाटील नाळवा शेतात रविवारी दुपारी दोन वाजता  पाच ते सहा गव्यांचा कळपातील एका गव्याने  प्रतिक गणपती पाटील वय   २२ यास धडक मारल्याने त्याच्या पोटात व हातात शिंग घुसल्याने हा युवक गंभीर जखमी झाला आहे.  त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  तर साताप्पा कुंडलिक पाटील वय ५० यांना देखील गव्याने धडक दिल्याने त्यांना मुक्का मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या गव्यांनी पाटील नाळवा नावाच्या शेतातील पिकांचे नुकसान केले आहे.  या गव्यांच्या कळपामुळे परिते येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. तरी वनविभागाने य...

सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात नितीन गडकरी यांचे मोठे विधान.

Image
  सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत आपल्या स्वार्थासाठी  जात उभी करतात नितीन गडकरी यांचे मोठे विधान. ------------------------------ फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र अमरावती.जिल्हा प्रतिनिधी पी.एन. देशमुख ------------------------------ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्ट  वक्तव्यासाठी ओळखले जातात.आजही त्यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलताना पुढाऱ्याबाबत मोठे विधान केले आहे .सर्वसामान्य जनता जातीवादी नाही. तर पुढारी जातीवादी आहेत असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात.असेही ते म्हणाले नागपूर येथे नुकतीच हिंसाचाराची घटना घडली अस नितीन गडकरी च्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख, स्मृती पुरस्कार 20२४ ने, सन्मान करण्यात आला पाच लाख, रोखनपत्र मानपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप , या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार बळवंत वानखडे आमदार संजय खडके माजी आमदार प्रवीण पोटे आमदार सुलभा खोड...

क॥ठाणे उपसरपंचपदी साऊताई पाटील व तंटामुक्त अध्यक्ष पदी यशवंत श्रीपती पाटील यांची बिनविरोध निवड.

Image
क॥ठाणे उपसरपंचपदी साऊताई पाटील  व तंटामुक्त अध्यक्ष पदी यशवंत श्रीपती पाटील यांची बिनविरोध निवड. ---------------------------------  पन्हाळा प्रतिनिधी  आशिष पाटील --------------------------------- पन्हाळा तालुक्यातील क॥ठाणे  येथे वर्षाभरापूर्वी  झालेल्या निवडणूकीत जय हनुमान गाव विकास पँनेलने निर्विवावाद सत्ता स्थापन केली होती. पहिला उपसरपंच पदाचा मान ऋषीकेश पाटील यांना मिळाला होता.कार्यकाल ठरल्यामुळे ऋषीकेश पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नूतन उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडीत साऊताई दिपक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  दरम्यान निवडून आलेल्या सदस्यांना उपसरपंचपदाची समान संधी देण्याचे ठरले होते. सरपंच प्राजक्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रीया पार पडली.निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका सुनिता कुंभार यांनी काम पाहिले.दरम्यान यशवंत श्रीपती पाटील यांची सरपंच प्राजक्ता पाटील यांनी तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहिर केली.         निवड जाहिर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आताषबाजी करत आ...

पाटपन्हाळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल बांद्रे.

Image
पाटपन्हाळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल बांद्रे. -------------------------------------   पन्हाळा प्रतिनिधी  आशिष पाटील  ------------------------------------- पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल बाळकृष्ण बांद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा पाटील होत्या.स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी सुभाष भोसले यांनी केले. याप्रसंगी मावळते उपसरपंच प्रवीण तेली ,सदस्य उज्ज्वला पाटील, शोभा गुरव,निशा कांबळे, राजीव कांबळे, रंजना बांद्रे, रावसाहेब पाटील यांनी नुतन उपसरपंच विठ्ठल बांद्रे यांचा शाल श्रीफळ देउन सत्कार केला.    यावेळी कुंभी साखर कारखाना संचालक गट नेते पी. डी. पाटील, संजय तेली, संतू पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तर आभार दीपक पाटील यांनी मानले .

मेळघाट रंगोत्सवात पथनाट्य, लोकनृत्य, एकांकिकांमधून जनजागृती नागरिकांनी घेतला शासकीय सुविधांचा लाभ.

Image
  मेळघाट रंगोत्सवात पथनाट्य, लोकनृत्य, एकांकिकांमधून जनजागृती नागरिकांनी घेतला शासकीय सुविधांचा लाभ. --------------------------------  अमरावती जिल्हा प्रतिनिधी  गजानन जिरापुरे --------------------------------       अमरावती, दि. 23: जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या वतीने चिखलदरा येथे आज 'मेळघाट रंगोत्सव 2025' उत्साहात पार पडला. या महोत्सवात स्थानिक कलाकारांनी पथनाट्य, लोकनृत्य आणि एकांकिकांमधून उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती केली. तसेच नागरिकांनी शासकीय सुविधांचा लाभ घेतला.      यावेळी आमदार केवलराम काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, धारणीच्या उपविभागीय अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, तहसीलदार जीवन मोरनकर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे आदी उपस्थित होते.      महोत्सवात लोकनृत्य, पाककला, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. लोकनृत्य स्पर्धेत प्रथम बिजूधावडी, ता. धारणी, द्वितीय ढाकणा, ता. चिखलदरा, तृतीय बेरदाबला तर प्रोत्साहनपर भिरोजा, ता. चिखलदरा आणि कोयलार...

माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेस 105 वर्षे पूर्ण.

Image
  माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेस 105 वर्षे पूर्ण. ------------------------------ कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------------ २१ मार्च १९२० रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव ता. हातकणंगले येथे संपन्न झालेल्या *ऐतिहासिक परिषदेस आज २१ मार्च २०२५ रोजी १०५* वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या माध्यमातून १०५ वा वर्धापन दिन सोहळा *महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार श्री. संजयजी शिरसाट साहेब* यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.        यावेळी कार्यक्रमास *माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर* ( संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर ), आमदार अशोक माने, माजी आमदार राजीव आवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, बार्टीचे सर्व अधिकारी व कर्मचारी, उत्तमदादा कांबळे, माणगावचे सरपंच राजू मगदूम सदस्य नितीन कांबळे, अंकुश माने, सुनील माने, योगेश चोकाककर, रणजित केळुस्कर, शशीकांत मिणचेकर, अनिल माने, अजित कांबळे, रमेश का...

सांगली फाटा येथे ९ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी.

Image
  सांगली फाटा येथे ९ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी. ---------------------------  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  शिरोली प्रतिनिधी अमित खांडेकर  ---------------------------   स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन अवैध गांजाची वाहतूक, विक्री करणारे इसमांवर कारवाई करणेसाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सागर चौगले यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सांगली फाटा येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता घेवून जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक श्री. चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक श्री. जालींदर जाधव व पोलीस अंमलदारांचे पथक यांचेसह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावुन दि. 22/03/2025 रोजी छापा टाकला असता आरोपी इसम नामे सत्यजीत सदाशिव जाधव वय 34, रा. २२ / १४१४ जाधव बोअरवे...

कोनोली शाळेचे कार्य आदर्शवत-दिपक मेंगाणे.

Image
कोनोली शाळेचे कार्य आदर्शवत-दिपक मेंगाणे. ------------------------------------- पन्हाळा प्रतिनिधी   आशिष पाटील ------------------------------------- विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेला  राधानगरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री. दीपक मेंगाणे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन प्रज्ञा शोध परीक्षा,सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय यशाबद्दल आणि एकंदरीत कामाचा  आढावा घेऊन शाळेबद्दल त्यांनी गौरवोउद्गार काढले.  एवढ्या दुर्गम भागातील शाळा असून देखील शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून सर्व सोयी सुविधांनी युक्त असा आहे.याठिकाणी कार्यरत शिक्षक संख्या कमी असून देखील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळेला यशाच्या शिखरावर नेले आहे.यापुढील काळातही अशीच प्रगती होत जावो अशा सदिच्छा दिल्या.शाळेची सर्व क्षेत्रातील प्रगती प्रेरणादायी असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.शाळेमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा, त्याचबरोबर मुलांच्यातील शिस्तबद्धपणा, नीटनेटकेपणा, गुणवत्ता याचा प्रामुख्याने उल्लेख  करून  सर्वांचे कौतुक केले .विशेषतः शाळेसाठी श्री आनंदा पा...

लाखोंच्या मोटार सायकली चोरणाऱ्या पाच चोरट्यांच्या करवीर पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Image
  लाखोंच्या मोटार सायकली चोरणाऱ्या पाच चोरट्यांच्या करवीर पोलिसांनी आवळल्या मुसक्या. ---------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी  शशिकांत कुंभार. ----------------------------------  (कोल्हापूर ):- करवीर पोलिसांनी मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळत लाखोच्या मोटारसायकल हस्तगत करीत पाच चोरांना अटक केली   करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकाकडुन चोरीच्या यामाहा RX-१००, KTM Duke, सुझुकी, टीव्हीएस MAX - १०० कंपनीच्या १५ मोटरसायकली व गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटरसायकली अशा एकुण ०७,००,०००/- रुपये किंमतीच्या एकुण १८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.  पोलीस ठाणे करवीर पोलीस ठाणे यातील गुन्हा रजि. नं व कलम फिर्यादी नांव व पत्ता गुन्हा रजि. नं. १६०/२०२५ रितेश नामदेव कोळी, रा.यांनी फिर्यादी दिल्या प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) प्रमाणे चिंचवाड, ता. करवीर, कोल्हापूर दाखल होती. गु. घडला ता व वेळ दि. १८/०२/२०२५ रोजी २२.०० वा ते दि.१९/०२/२०२५ रोजी ०४.०० वा चे सुमारास केलीं फाटा, केलीं, ता. करवीर कोल्हापूर येथे त्या नुसार जप्त मुद्देमाल असा १) KTM Duke ...