वाघापूर येथे कृष्णात डोणे महाराज यांच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महापूर.
वाघापूर येथे कृष्णात डोणे महाराज यांच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महापूर.
--------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
---------------------------
श्री विठ्ठल बिरदेव श्री हालसिद्धनाथ श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर भाकनुकनार मानकरी श्री गुरु माऊली श्रीकृष्णात डोणे (वाघापूरे) महाराज यांच्या दर्शनासाठी वाघापूर येथे भक्तांचा महापूर लोटल्याचे पहावयास मिळाले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाघापूर येथील श्री विठ्ठल बिरदेव हा सिद्धनाथ यांच्या दरबारामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता यानिमित्ताने सकाळी सात वाजता श्रींचा अभिषेक यानंतर सकाळी आठ वाजता पाद्यपूजन नामस्मरण जप व ध्यान सकाळी दहा वाजता वारंग आरती सकाळी 11 वाजता महाप्रसाद दुपारी एक वाजता भजन व धनगरी ओव्या आणि सायंकाळी सहा वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गुरुमाऊली कृष्णात डोने त्यांचा भक्त समुदाय महाराष्ट्रात सह देशभरात पहावयास मिळतो गुरु पौर्णिमेनिमित्त त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी आरती झाल्यानंतर या दिवसभरातील कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी कै. बाबुराव कृष्णा डोने यांचे नुकतीच निधन झाले आहे त्यांची देखील आठवण भक्तांनी डोळ्यांमध्ये पाणी आणत काढली
यावेळी गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज यांचे चिरंजीव बाळु महाराज राजवीर कृष्णात डोणे हे देखील उपस्थित होते यावेळी भक्तांचा मोठा जनसमुदाय पहावयास मिळाला.
Comments
Post a Comment