Header Ads

कुंभवडे येथे धनगर समाजाच्या गजा नृत्याने नवरात्रोत्सवात रंगत पारंपरिक लोककलेचे दर्शन; लक्ष्मण कोकरे, प्रकाश कोकरे, केशव खरात व संतोष शेळके यांचा सहभाग..

 कुंभवडे येथे धनगर समाजाच्या गजा नृत्याने नवरात्रोत्सवात रंगत

पारंपरिक लोककलेचे दर्शन; लक्ष्मण कोकरे, प्रकाश कोकरे, केशव खरात व संतोष शेळके यांचा सहभाग.



शाहुवाडी प्रतिनिधी: आनंदा तेलवणकर 

मो.9404477703


शाहुवाडी : नवरात्रोत्सवानिमित्त कुंभवडे येथील महादेव मंदिर परिसरात धनगर समाजाच्या पारंपरिक गजा नृत्याने उत्सवात रंगत आणली. पारंपरिक वेशभूषा, ठेका आणि लोककलेचा आविष्कार यांमुळे या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

धनगर समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या गजा नृत्यातून ग्रामीण लोकजीवन आणि परंपरेचे दर्शन घडले. लक्ष्मण कोकरे, प्रकाश कोकरे, केशव खरात आणि संतोष शेळके यांच्यासह सहभागी कलाकारांनी नृत्यात उत्साहाने सहभाग घेतला.


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक लोककलांचे सादरीकरण होत असल्याने सांस्कृतिक वारसा जपण्यास हातभार लागत आहे. अशा उपक्रमांतून नव्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख होण्यास मदत होत आहे.

No comments:

Powered by Blogger.