पन्हाळा तालुका वारकरी परिषदेत ह.भ.प.आनंदा पाटील यांची निवड.
पन्हाळा तालुका वारकरी परिषदेत ह.भ.प.आनंदा पाटील यांची निवड.
---------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
9595316266
---------------------------------
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या तालुका सचिव पदी मरळी गांवचे ह.भ.प. आनंदा कृष्णा पाटील यांची निवड झाली . त्यांना जिल्हा अध्यक्ष ह. भ. प .महादेव यादव महाराज कोल्हापूर यांनी निवडीचे सन्मानपत्र दिले . या वेळी जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. आनंदराव वायदंडे ह.भ.प .नामदेव मोळे घरपण ह.भ.प .ईश्वरा लोकरे हे हजर होते . महिला सक्षमिकरण करून त्यांना हरिपाठ व भजनाचे शिक्षण देणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पन्हाळा तालुक्यात वारकरी सांप्रदाय वाढवणेसाठी व तालुक्यात वारकरी विद्यापिठे स्थापन करणेस ,त्याचा पाठपुरावा करणार असे नुतन तालुका अध्यक्ष आनंदा पाटील यांनी सांगितले . या वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पाटील (काका) हे आहेत . या निवडीसाठी त्यांना माऊली भजनी मंडळ मरळी यांचे सहकार्य लाभले .
Comments
Post a Comment