संत नामदेव शिंपी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे.देवस्थान कमिटीचे सचिव शिवराज नायकवडे.

 संत नामदेव शिंपी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे.देवस्थान कमिटीचे सचिव शिवराज नायकवडे.

-------------------------------- 

कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------- 

संत नामदेव महाराज यांनी शिंपी समाजाचे महाराष्ट्रात नावलौकिक केले आहे याचा आदर घेऊन समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दैव नामदेव महाराज यांची 675 वी जयंती संत नामदेव बोर्डिंग विद्यार्थी वस्तीग्रह उत्तरेश्वर पेठ कोल्हापुर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले

कोल्हापूर मधील समस्त दैव नामदेव बोर्डिंग विद्यार्थी वस्तीग्रह उत्तरेश्वर पेठ येथे शासनाच्या वतीने 675 वि संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा निमित्त नामदेव महाराज प्रतिकृती पुतळ्यास पुष्पहार घालून यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांचा सत्कार समाजाचे माजी अध्यक्ष एडवोकेट किशोर नाझरे यांच्या हसतेसत्कार करण्यात आला

नामदेव बोर्डिंग विद्यार्थी वस्तीग्रह उत्तरेश्वर पेठ या वस्तीगृहाला प्रसिद्ध सिनेसृष्टीतील सूर्यकांत मांढरे यांच्या वतीने तीन लाखाची देणगी जाहीर केली असल्याचे एडवोकेट किशोर नाझरे यांनी सांगितले एडवोकेट किशोर नाझरे यांचा शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्माई प्रतिमा देऊन सत्कार शिवराज नायकवडे यांच्या हस्ते करण्यात आला

या कार्यक्रमास संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा कमिटीचे अध्यक्ष रत्नदीप चोपडे उपाध्यक्ष नरेंद्र मायनेकर सेक्रेटरी सौ कोमल पिसे उपसेक्रेटरी सौ पूजा वादावणे उपखजाणीस सौ अस्मिता मुद्राळे नामदेव महाराज महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ अलका बकरे सौ संध्या हिरवे तसेच समस्त देव नामदेव शिंपी समाज व महिला मंडळ युवा मंच समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.