गारगोटीत मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर.
गारगोटीत मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर.
------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
------------------------------------
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज महाराष्ट्रभर महा रक्तदान शिबिराचासंकल्प करण्यात आला होता .त्यानुसार आज भुदरगड तालुक्यामध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आयोजन करण्यात आलेले आहे . या शिबिरात आज 147 रक्तदात्यांनी रक्तदान करून नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोठेही होर्डिंग लावू नका बॅनर लावू नका अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या यामध्ये आपला वाढदिवस काही सेवा कार्याच्या माध्यमातून पूर्ण व्हावा असा संकल्प देवेंद्रजी फडणवीस यांनी केला होता त्यानुसार यामध्ये महा रक्तदान शिबिर आयोजित करून राज्यभरामध्ये प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे एकाच दिवशी आयोजन करावे व एक लाखापेक्षा अधिक बाटल्यांचे रक्त संकलन करावे असा संकल्प सोडला होता त्यास अनुसरून आज भुदरगड तालुक्यामध्ये भुदरगड भाजपा कार्यकर्त्यांनी 147 रक्त बाटल्यांची संकलन केली असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगुले आणि संतोष पाटील यांनी दिली .
संजीवन ब्लड बँक यांच्या माध्यमातून सदर रक्तदान शिबिर आयोजित करण्यातआले होते .
त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर,वसंतराव प्रभावळे,पांडुरंग वायदंडे,रवींद्र कामत, रणजीत आडके,अमृत गुरव,विनू शिंदे,मोहन सूर्यवंशी,संतोष बरकाळे,प्रशांत पुजारी, प्रविण पाटील निवास देसाई,राहुल चौगले,सचिन देसाई,संजू पोर्लेकर,रमेश रायजादे,सुनील पाटील,अवधूत राणे,अमोल पाटील,सुशांत इंदुलकर,सुशांत नाईक, अमोल गुरव, विठ्ठल चौगले,गणपती खापरे,युवराज चौगले, बाजीराव खापरे,जयवंत चौगले,संजू मिटके,रणधीर गुरव,बबनराव निकम ,ऐश्वर्या पुजारी, निकिता जानवेकर यांचेसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते .
No comments: