Header Ads

खोटी कागदपत्रे दाखवून मागासवर्गीय प्रकल्प ग्रस्ताची पुनर्वसनाची जमीन हडप.गांधीनगर मधील प्रकार.ब्लॅक पँथर च्या वतीने आंदोलनाचा इशारा.

 खोटी कागदपत्रे दाखवून मागासवर्गीय प्रकल्प ग्रस्ताची पुनर्वसनाची जमीन हडप.गांधीनगर मधील प्रकार.ब्लॅक पँथर च्या वतीने आंदोलनाचा इशारा.

----------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

-----------------------------

कोल्हापूर : ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 31/07/25 रोजी मा. तुषार ठोंबरे साहेब अप्पर आयुक्त महसूल विभागीय आयुक्त,कार्यालय विधानभवन पुणे यांना निवेदन देण्यात आले.


 कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय प्रकल्प ग्रस्थांना पुनर्वसन अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांनी गेल्या 30 ते 35 वर्षांपासून पुनर्वसन चे भूखंड व जमीन वाटप पासून जातीय द्वेषातुन व आर्थिक पूर्तता करत नसलेने अनेक लाभापासून वंचित ठेऊन दुसरीकडे इतरांना मात्र शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून उच्च न्यायालय, विभागीय आयुक्त पुणे इत्यादी वरीष्ठांना खोटी कागदपत्रे पुरवून उचगांव मधील गट न 175 क येथील 150 ते 200 कोटीची जमीन हडप करून सदर फाईल देखील गायब केली असल्याचे समजते. तरी सदर अधिकारी यांची खातेनिहाय व संप्पतीची चौकशी करून पुनर्वसन विभागाची श्वेत पत्रिका काढून बेकायदेशीर वाटलेली जमीन जप्त करून मागासवर्गीयांना वाटप करावी अन्यथा ब्लॅक पँथर पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.


       कोल्हापूर जिल्हा

No comments:

Powered by Blogger.