नांदणी येथील माधुरी हत्तिणीसाठी रूकडी बंद पाळुन काढला मूक मोर्चा.
नांदणी येथील माधुरी हत्तिणीसाठी रूकडी बंद पाळुन काढला मूक मोर्चा.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
माधुरी हत्तीनेला पेटा संस्थेच्या तक्रारीवरून उच्च न्यायालयाने प्राणी हक्क संरक्षण कायद्याचा आधार घेत गुजरात राज्यातील जामनगर इथल्या व वनतारा हत्ती केंद्रात पाठवण्याचा आदेश देवून हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केली आहे. महाराष्ट्र सह कर्नाटकातील लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारने केलेली तक्रार चुकीची असल्याचे आरोप करत या घटनेचा निषेधह नोंदवण्यासाठी आणि महादेवी हत्तीनीला परत मठा कडे सुपूर्त करा या मागणीसाठी हातकणंगले तालुक्यातील रुकडी ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवून मूक मोर्चा काढला त्या मोर्चाला जैन मंदिरापासून सुरुवात झाली हा मोर्चा ग्रामपंचायत चावडी चौक , वैरण बाजार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठेतून चावडी चौकात आला त्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी निषेध व्यक्त केला.
महादेवी हत्तीनीला जोपर्यंत नांदणी मठाकडे सोडत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे, पोलीस पाटील कविता कांबळे , रुकडी जैन समाजाचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे भगवान जाधव, शीतल खोत, बबलू मकानदार ,राजू मुलांनी, शांतिनाथ कोगनुळे भारतीय जैन संघटनेचे अभिनंदन खोत ऍडव्होकेट सुरेश पाटील शमवेल लोखंडे, महादेव माळी, अनिकेत देसाई, अमर आठवले ज्योती मगदूम, मंगल चिंचवाडे, सरोज खोत ,कल्पना देसाई, अश्विनी देसाई यांच्यासह सर्व समाजाचे प्रमुख उपस्थित होते यावेळी रुकडी व्यापारी असोसिएशन ने आपले सर्व व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चा सहभाग नोंदवला अत्यावश्यक सेवा आणि शाळा वगळता सर्व व्यवहार दिवसभर ठप्प होते.
Comments
Post a Comment