प्रकाश आवाडे क्रीडा व मोफत आरोग्य संस्था – फिरत्या दवाखान्याची सातवे येथून सुरुवात.
प्रकाश आवाडे क्रीडा व मोफत आरोग्य संस्था – फिरत्या दवाखान्याची सातवे येथून सुरुवात.
-----------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
-----------------------------------
: आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून तसेच पेठवडगावचे सामाजिक कार्यकर्ते वैभव हिरवे यांच्या माध्यमातून आज सातवे येथे प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी मार्फत मोफत फिरत्या दवाखान्याचे उदघाटन करण्यात आले.
या दवाखान्याचे उदघाटन जितेंद्र चव्हाण व सागर पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी तब्बल १५० रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचारही पूर्णपणे विनामूल्य देण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सुषमा पुजारी यांनी काम पाहिले. कार्यक्रमास भरत तायमाचे, संजय सावंत, संदीप माळी, दत्ता काळे, अनिल काळे, सागर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment