२५ वर्षांनंतर दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शाळेला स्मार्ट एलईडी प्रोजेक्टरची भेट.
२५ वर्षांनंतर दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शाळेला स्मार्ट एलईडी प्रोजेक्टरची भेट.
----------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
----------------------------
श्रीमती भा.रा. यादव हायस्कूल सावर्डे-थेरगाव येथे सन 2000-2001 या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
मे महिन्यात झालेल्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती-जमती, अभ्यासाचे दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन, सहली, क्रीडा स्पर्धा आणि शिक्षा अशा गोड आठवणींना उजाळा दिला.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काहीतरी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक श्री. पी.आर. पाटील सर यांनी शाळेला स्मार्ट एलईडी प्रोजेक्टरची गरज असल्याचे सांगितले. सुरुवातीला ३० हजाराचा अंदाज होता, पण विद्यार्थ्यांनी शिराळा येथे माहिती घेतल्यानंतर ८१,५०० किमतीचा अत्याधुनिक प्रोजेक्टर घेण्याचे ठरवले.
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून निधी संकलनाची मोहीम सुरू झाली. थोड्याच दिवसांत ७१,५०० रुपये जमा झाले. उर्वरित रक्कम शिक्षकांनी देण्याचे कबूल केले. अखेर पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचित्याने माजी विद्यार्थी अमित बच्चे, महादेव इंगवले व पांडुरंग कुंभार यांनी शाळेत येऊन प्रोजेक्टर सप्रेम भेट दिला.
शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी या दातृत्वाचे मनःपूर्वक कौतुक केले. "आपण दिलेली ही भेट शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच भर घालेल," असे शिक्षकांनी सांगितले.
Comments
Post a Comment