कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी.
कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी.
******************
कळे प्रतिनिधी,
सुनिल मोळे
*******************
कळे ( ता. पन्हाळा ) येथील कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे प्रशालेच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.बी.गायकवाड होते. ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतील सहा. शिक्षिका एस. आर. भोई यांनी लालबहादूर शास्त्री यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलघडला तर सहा. शिक्षक पी. एल. हावळ यांनी महात्मा गांधी यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलघडला .
स्मिता जीवन मिठारी , शर्वरी विनायक शिंदे, जान्हवी विश्वनाथ झुरे या विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन शर्वरी विनायक शिंदे या विद्यार्थिनीने केले. आभार ग्रंथापाल प्रशांत कालेकर यांनी मानले.
No comments: