अंबप मध्ये गायसाठी डोहाळे जेवण सोहळा; श्रद्धा आणि उत्साहाचा संगम.
अंबप मध्ये गायसाठी डोहाळे जेवण सोहळा; श्रद्धा आणि उत्साहाचा संगम.
**************************
अंबप प्रतिनिधी: किशोर जासूद
***************************
भारतीय संस्कृतीत गाईला ३६ कोटी देवतांचं स्वरूप मानलं जातं. त्या श्रद्धेने अंबप गावातील शेतकरी महेश वसंत माने यांनी गायसाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम राबवला. हा कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
गावातील महिला, पुरुष, लहान मुले आणि इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी गायला स्नान घालून, फुलांनी सजवून तिचे पूजन करण्यात आले. विशेष आहार देऊन गायस कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
महिलांनी मंगलगीतं गाऊन वातावरण अधिक पवित्र केलं, तर लहान मुलांनी गाईच्या पायांवर फुले वाहून आपली भक्ती व्यक्त केली. वडीलधाऱ्यांनी गायचं महत्त्व अधोरेखित करत सांगितलं, “जनावरांना आपल्या परिवारातील सदस्यासारखे जपा, त्यातून खरी मानवता प्रकट होते.”
या उपक्रमामुळे गावात एकोपा, ऐक्य आणि परंपरेबद्दल अभिमान जागृत झाला. श्रद्धा, संस्कृती आणि प्रेमाचा संगम घडवणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
No comments: