Header Ads

सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचा आत्मा आहेत.- प्रा संजय ठिगळे.

 सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचा आत्मा आहेत.- प्रा संजय ठिगळे. 

------------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

------------------------------------

सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचा आत्मा आहेत म्हणूनच सहकारी संस्था, सहकारी चळवळ माझी आहे. ही भावना वाढीस लागली पाहिजे. असे प्रतिपादन प्रा संजय ठिगळे यांनी केले ते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना हमिदवाडा व कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडलिक साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आनंदराव फराकटे होते.यावेळी साखर कारखाना संचालक भगवान पाटील, तुकाराम ढोले, जिल्हा सहकार बोर्ड संचालक प्रवीण सुर्यवंशी, दीपक माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

स्वागत लेबर ऑफिसर शांतिनाथ मगदूम यांनी, प्रास्ताविक जिल्हा सहकार विकास अधिकारी एस एस देसाई यांनी, तर आभार सुदाम देसाई यांनी मानले. 

   प्रा. ठिगळे म्हणाले, सहकार क्षेत्राच्या विकासामुळे बहुजन समाजातील अनेक मुले आज उच्चविद्या विभूषित झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतकऱ्यांची सावकारांकडून होणारी पिळवणूक कमी करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले असून, सहकारी संस्था या देशातील बहुजनसमाज विकासाची खरी मंदिरे आहेत. फक्त त्या ठिकाणी पावित्र्य पाळणे गरजेचे आहे. कृषी संस्कृतीमुळे सहकाराचा विकास झाला आहे, मात्र आज सहकारी संस्था टिकण्यासाठी त्यातील गळती थांबविली पाहिजे.

  प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर सहकार ध्वजारोहण व्हाईस चेअरमन आनंदराव फराकटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार गीताचे सामुदायिक गायन करण्यात आले. या कार्यक्रमास कारखान्याचे सेक्रेटरी श्री आर बी बोंगार्डे, लेबर ऑफिसर शांतिनाथ मगदूम, जिल्हा सहकार विकास अधिकारी एस एस देसाई, मुख्य शेती अधिकारी प्रताप मोरबाळे, पर्चेस अधिकारी जयेंद्र कोंडेकर यांचे सह कारखान्यातील विविध विभागातील अधिकारी, पदाधिकारी, व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.