Header Ads

मडगाव रेल्वे स्टेशनवर मोठी कारवाई : ५० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, हरियाणातील चौघांना रेल्वे पोलिसांनी गजाआ.ड.

 मडगाव रेल्वे स्टेशनवर मोठी कारवाई : ५० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, हरियाणातील चौघांना रेल्वे पोलिसांनी गजाआ.ड.

-------------------------------

  मडगाव प्रतिनिधी 

-------------------------------


मडगाव : मत्स्यगंधा एक्सप्रेस (क्रमांक 12620) मधील चोरीप्रकरणातील संशयित आरोपींवर रेल्वे पोलिसांनी मडगाव येथे मोठी कारवाई करत तब्बल ५० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, हरियाणातील चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.


दक्षिण रेल्वेकडून चोरीप्रकरणाबाबत तातडीने माहिती मिळाल्यानंतर संशयित चार व्यक्तींचे फोटो व सीसीटीव्ही फुटेज व्हॉट्सअॅपद्वारे विविध पथकांना पाठवण्यात आले होते. या आधारे सर्व पथके सतर्क ठेवण्यात आली होती.


यानुसार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मत्स्यगंधा एक्सप्रेस मडगाव रेल्वे स्टेशनवरील पहिल्या प्लॅटफॉर्मवर दाखल होताच आरपीएफ/एमएओच्या पथकाने सापळा रचत हरियाणातील सर्व चार संशयितांना ताब्यात घेतले. पथकाने अल्पावधीत प्रभावी शोधमोहीम राबवत ही कारवाई पार पाडली.


तपासादरम्यान आरोपींकडून अंदाजे ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ₹३४,५०० इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली. या जप्तीमुळे संबंधित चोरी प्रकरणातील महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला असून पुढील तपास सुरू आहे.


आरपीएफच्या जलद, काटेकोर आणि समन्वित कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा धडक संदेश मानला जात आहे.

No comments:

Powered by Blogger.